कलाकार आणि सोशल मीडिया या दोन गोष्टी आजच्या काळात एकमेकांना पूरक ठरत आहे. सोशल मीडियायाची व्याप्ती आणि पोहच बघता कलाकारांना फॅन्ससोबत आणि प्रकाशझोतात राहण्याचा हा उत्तम पर्याय आहे. याच सोशल मीडियावर कलाकार विविध पोस्ट टाकून फॅन्ससोबत जोडलेले असतात. कलाकारांचे फोटोशूट हा तर एक सोशल मीडियावरील नेहमी गाजणारा मुद्दा आहे. या फोटोशूटवरून कलाकारांना अनेकदा वादाला आणि ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते. फोटोशूटमुळे सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे निया शर्मा.
टेलीव्हिजन इंडस्ट्री आपल्या उत्तम अभिनयाने गाजवणारी निया तिच्या अभिनयासोबतच बोल्डनेसमुळे देखील खूप लाईमलाईट्मध्ये असते. तिचे सोशल मीडिया अकाऊंट जर पाहिले, तर त्यात तिच्या बोल्ड फोटोंचा भरणा दिसेल. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी निया नेहमी तिच्या वेगवेगळ्या फोटोंमुळे मीडियामध्ये येते. तिच्या बोल्ड फोटोजमुळे तिला नेहमी ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते. मात्र, ती ट्रोलर्सला कधीच घाबरत नाही. (nia sharma posting backless video)
नियाने अशातच तिचा बोल्ड आणि रिवीलिंग टॉप घालून एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ पोस्ट करताना दिलेले कॅप्शन पाहून असेच जाणवत आहे की, तिने हा व्हिडिओ मुद्दामच पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले, “बॅकलेस घालताना कधीही निष्काळजीपणा करू नका. (हे पण काढून टाक, नंगी, कपडे नाही का तुझ्याकडे, निर्लज्ज) हे म्हणणाऱ्यांना फ्लक यू व्हेरी मच” तिचे हे कॅप्शनवाचून आपल्या लक्षात येईल की, तिला तिच्या कपड्यांवरून, फोटोंवरून किती खालच्या पातळीवर जाऊन लोकं कमेंट्स करत असतील. मात्र, तिने तिच्या या व्हिडिओतून ट्रोलर्सला चांगलीच चपराक दिली आहे.
या व्हिडिओमध्ये नियाने डार्क लिपस्टिक, काळ्या रंगाचा अतिशय शॉर्ट आणि बॅकलेस टॉप, त्यावर जीन्स घातलेली दिसत आहे. या व्हिडिओमधून ती तिची बॅक आणि फिगर फ्लॉन्ट करत मादक अदा दाखवत आहे. हा व्हिडिओ आणि त्याचे कॅप्शन वाचून अनेकांनी तिला समर्थन दिले आहे, तर काहींनी पुन्हा तिच्यावर कमेंट्स करत ट्रोल करायला सुरुवात केली.
नियाला स्टार प्लसच्या ‘एक हजारो मैं मेरी बेहना हैं’ मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती फक्त आणि फक्त यश मिळवत गेली. तिला लोकप्रियतेत अधिक भर ‘जमाई राजा’ या मालिकेने घातली. त्यानंर्र तिने तिचा मोर्चा रियॅलिटी शोकडे वळवला. ती ‘खतरों के खिलाड़ी’ या शोमध्ये स्टंट करताना दिसली. काही महिन्यांपूर्वीच तिची ‘जमाई राजा २.०’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली. यात तिने अनेक बोल्ड सीन्स दिले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?
–सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…
–मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल










