अभिनेत्री निया शर्मा छोट्या पडद्यावरील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या हॉट लूकमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. कधी बॅकलेस टॉप, तर कधी निया तिच्या बिकिनी फोटोशुटमुळे सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. अलीकडेच नियाने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने घातलेल्या कपड्यांवरून तिला खूप ट्रोल करण्यात आले होते. मात्र नियाने त्यांना सडेतोड उत्तरही दिलं होतं.
यावेळी पुन्हा एकदा नियाने तिच्या सोशल मीडिया हँडल्सवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये पुन्हा तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये निया शर्मा अतिशय बोल्ड दिसत आहे. तिच्या या बोल्ड फोटोशूटवर चाहते घायाळ झाले आहेत.
हे ब्रालेस फोटोशूट आहे, ज्यामध्ये निया शर्माने गुलाबी क्रॉप जॅकेट आणि पांढरी जीन्स परिधान केलेली दिसत आहे. नियाने या लूकवर नेकलेस आणि ब्रेसलेट देखील घातले आहे. फॅशनिस्ट नियाने या फोटोत कहर केला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
नियाने तिच्या डोळ्यांचा प्रचंड सुंदर असा मेकअप केला आहे. खुल्या कुरळ्या केसांमध्ये निया सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोशूटवर युजर्सच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले, ‘खुप सुंदर’. तर दुसऱ्याने लिहिले, ‘कुत्र्याने तुझे कपडे फाडलेत का?’ एकाने लिहिले की, ‘तु आतील टॉप घालायला विसरलीस का?’
निया आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही तिला तिच्या कपड्यांमुळे अनेक वेळा ट्रोल केले गेले आहे. ती अनेकदा तिच्या बोल्ड फोटोसाठी ट्रोल झाली आहे. पण नियाला तिरस्कार करणाऱ्यांची पर्वा नाही. तिने अनेक वेळा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून, तिरस्कार करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.
निया इंडस्ट्रीमध्ये तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. तिने तिच्या करिअरमध्ये ‘नागिन’, ‘जमाई राजा’ आणि ‘एक हजार में मेरी बेहना है’ सारख्या अनेक हिट शोमध्ये काम केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त, निया सोशल प्लॅटफॉर्मवर देखील खूप सक्रिय आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’