Tuesday, July 9, 2024

प्रियांका चोप्राचा दिवाळी लूक पाहून निक जोनसही झाला फिदा, पत्नीसाठी केली खास कमेंट

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला कर्तुत्वाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. ती अनेकदा तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. कामात इतकी व्यस्त असूनही ती सोशल मीडियावर सक्रिय राहण्यास विसरत नाही. ती अनेकदा तिचा पती निकसोबतचे फोटो शेअर करते. नुकतेच आता प्रियांका चोप्राने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दिवाळीच्या निमित्ताने खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती एथनिक पोशाखात दिसत आहे. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहते तर सोडाच, निकलाही या फोटोंचे वेड लागले आहे.

प्रियांका प्रत्येक सण उत्साहात साजरा करते. एवढेच नाही, तर पती निक जोनसही तिच्यासोबत सर्व सण साजरे करतो. प्रियांका सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे आणि ती तिथेच दिवाळी साजरी करणार आहे. यावेळी तिने तिचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच क्यूट दिसत आहे. इतकी क्यूट की, निक जोनासही फोटोंवर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.

निक जोनसने केले कौतुक
प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोत तिचा लूक पाहण्यासारखा आहे. ती ऑफ व्हाइट कलरच्या लेहेंग्यात दिसत आहे. या आउटफिटसोबत तिने चोकर देखील घातला आहे जो तिच्या लूकमध्ये भर घालत आहे. हे फोटो शेअर करण्यासोबतच तिने लिहिले आहे की, “सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा… प्रेम, दिवे आणि आनंद हा सण खूप कृतज्ञतेने साजरा करा, ते प्रेमाने भरले जावो” या फोटोवर प्रतिक्रिया करताना, तिचा पती निक जोनसने फायर इमोजी शेअर करून निकचे विशेष कौतुक केले आहे.

मोठ्या प्रोजेक्टवर करतेय काम
प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या ॲमेझॉन प्राइमच्या ‘सीटाडेल’ या सीरीजचे शूटिंग करत आहे. याशिवाय ती ‘द मॅट्रिक्स ४’ आणि ‘टेक्स्ट फॉर यू’मध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-क्या बात है! अभिनेत्री प्रियांका चोप्राने शेअर केला नवीन फोटो, पाहायला मिळाली तिच्या जाऊबाईंची झलक

-चेहरा भाजलेला असताना प्रियांका ठरली ‘मिस वर्ल्ड २०००’ची मानकरी, ‘असा’ लपवला होता डाग

-काय सांगता! प्रियांका चोप्राला एका माकडाने मारली होती थोबाडीत

हे देखील वाचा