क्या बात है! अभिनेत्री प्रियांका चोप्राने शेअर केला नवीन फोटो, पाहायला मिळाली तिच्या जाऊबाईंची झलक

0
120
Priyanka-Chopra
Photo Courtesy: Instagram/priyankachopra

जगभरात आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांकाने आपल्या मेहनतीच्या जोरावर आधी बॉलिवूडमध्ये आपला पाय भक्कम रोवला. त्यानंतर तिने हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली. तिने हॉलिवूड गायक आणि अभिनेता निक जोनाससोबत लग्न केले आहे. सध्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत प्रियांका आणि तिचा पती आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत एन्जॉय करत आहेत. नुकतेच या जोडप्याचे संपूर्ण जोनास कुटुंबासोबत रियूनियन झाले. खरं तर, सर्वजण एकत्र येऊन जोनास ब्रदर्सच्या फॅमिली रोस्टमध्ये सामील झाले. हे नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित केले जाईल.

प्रियांकाने नुकताच अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती प्रेक्षकांमध्ये बसली आहे. तिच्यासोबत तिची जाऊ डॅनियल जोनस आणि सोफी टर्नरही दिसत आहे. (Actress Priyanka Chopra Seen Chilling With Her Sister In Law And Gave Romantic Pose With Husband)

या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. सोफी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये, तर डॅनियल पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोत तिघीही खूप सुंदर दिसत आहेत. दुसरीकडे, निक जोनासचे वडील पॉल केविन जोनास देखील समोर कोपऱ्यावर बसले आहेत. प्रियांका चोप्राने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काल रात्री, या सुंदर लोकांसह, कोपऱ्यातील वरिष्ठांनाही विसरू नका.. #jonasbrothersfamilyroast.”

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाच्या या फोटोला आतापर्यंत ९ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच २ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्सचाही वर्षाव झाला आहे.

तसेच प्रियांकाने निक जोनाससोबतचा एक फोटो शेअर केला आहे. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांका निकला मिठी मारताना दिसत आहे. इव्हेंटनंतर दोघेही एकमेकांच्या कंपनीचा आनंद लुटताना दिसत आहेत. तसेच प्रियांकाने लिहिले आहे की, “माय हॅप्पी प्लेस.” याशिवाय अभिनेत्रीने आणखी एक विंटर सेल्फी पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

निक आणि प्रियांका अनेकदा एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. अलीकडेच एका कॉन्सर्टदरम्यान निकने प्रियांकाला परफेक्ट लाईफ पार्टनर म्हटले होते. यावर त्याच्या भावानेही प्रतिक्रिया दिली. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, निक म्हणाला होता, “मी माझ्या आयुष्यात कधीही चांगला निर्णय घेतला असेल तर तो प्रियांकाशी लग्न करण्याचा आहे. कृतज्ञतापूर्वक मला परिपूर्ण जीवनसाथी मिळाला.”

प्रियांकाच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची सन २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटात झळकली होती. सध्या ती ‘सिटाडेल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चाहत्यांसाठी खुशखबर! रजनीकांत यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, फोटो केले शेअर

-जान कुमार सानू सिद्धार्थ शुक्लाला देणार ट्रिब्यूट? नवीन गाण्याची घोषणा करताच ट्रोलर्सने साधला निशाणा

-दारूच्या ब्रँडची ऍड केल्यामुळे, काजल अग्रवालवर भडकले नेटकरी; ‘या’ शब्दांत केलं तिला ट्रोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here