Thursday, July 18, 2024

प्रियांका आधी ‘या’ हॉलिवूड सुंदरी होत्या निक जोनासच्या गर्लफ्रेंड, वाचा यादी

हॉलिवूड गायक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा (priyanka chopra) पती निक जोनास (Nick jonas) आज त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. निक जोनास त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. त्याचा जन्म 1992 मध्ये डॅलस, टेक्सास, यूएसए येथे पॉल केविन जोनास सीनियर यांच्या घरी झाला. निकचे खरे नाव निकोलस जेरी जोनास आहे. निक जोनासने वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती.

२०१६ मध्ये, निकचा पहिला अल्बम इट्स अबाऊट टाइम रिलीज झाला. ज्यानंतर त्याच्या बँडला डिस्ने चॅनलवर खूप यश मिळाले. प्रियांका चोप्राच्या आधी निक जोनासचे इतर चार महिलांसोबत अफेअर होते. निक जोनास अवघ्या 14 वर्षांचा असताना पहिल्यांदा प्रेमात पडला होता. डिस्ने स्टार आणि अमेरिकन गायिका-अभिनेत्री मायली सायरस हे निक जोनासचे पहिले प्रेम होते. एका मुलाखतीदरम्यान, त्याने स्वतः कबूल केले की मायली ही पहिली मुलगी होती. जून 2006 ते डिसेंबर 2007 या काळात तो या रिलेशनशिपमध्ये होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

यानंतर 2008 मध्ये निक जोनासच्या आयुष्यात पुन्हा एकदा नवीन एंट्री झाली. यावेळी तो सेलेना गोमेझच्या प्रेमात पडला. सेलेना निकच्या म्युझिक व्हिडिओचा एक भाग होती. 2011 मध्ये, निक जोनास ऑस्ट्रेलियन गायिका डेल्टा गुडरेमच्या प्रेमात पडला. जेमतेम 10 महिने टिकलेले हे नाते फेब्रुवारी 2012 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. डेल्टा निकपेक्षा 8 वर्षांनी मोठी होती.

2013 मध्ये फॅशन जगतातील लोकप्रिय मॉडेल ऑलिव्हिया कल्पोसोबत निकची जवळीक वाढली. मात्र, हे नाते दोन वर्षे टिकले आणि 2015 मध्ये दोघेही वेगळे झाले. यानंतर निकच्या आयुष्यात प्रियांका चोप्रा आली. निकने प्रियांकाला ग्रीसमध्ये प्रपोज केले होते. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर निकने २०१८ मध्ये लग्न केले. प्रियांका निकपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे, पण वयातील हे अंतर दोघांमध्ये कधीच भिंत बनले नाही. दोघेही आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद अतिशय सुंदर पद्धतीने घेत आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुःखद ! प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, कमी वयातच घेतला अखेरचा श्वास
‘धकधक गर्ल’च्या नवीन सिनेमातील ‘हे’ गाणे रिलीज; गायिका श्रेया घोषाल म्हणाली, ‘मी खूप नशीबवान…’
तापसीला झालंय तरी काय? आधी फोटोग्राफर अन् आता पत्रकारांवर संतापली; म्हणाली, ‘अय भावा ओरडू नको’

हे देखील वाचा