‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. माधुरीने तिच्या साैंदर्याने आणि डान्सने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. माधुरी ‘झलक दिखला जा 10’ या टीव्ही शोसोबतच तिच्या आगामी सिनेमामुळेही चर्चेत आहे. अशातच माधुरीच्या आगामी ‘मजा मा’ या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले आहे.
‘मजा मा’ (Maja ma) या चित्रपटातील गाणे रिलीज झाले असून गाण्याचे बाेल ‘बूम पडी’ (Boom Padi Song) आहेत. हे गाणे श्रेया घोषाल आणि उस्मान मीर यांनी गायले आहे. हे गरबा गाणे आहे. हे गाणे प्रिया सरैया यांनी लिहिले आहे, तर कृती महेशने कोरिओग्राफ केले आहे. हे गाणे बाॅलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिच्यावर चित्रीत करण्यात आले असून यात तिचा उत्तम डान्स पाहायला मिळत आहे.
आनंद तिवारी दिग्दर्शित आणि सुमित बठेजा लिखित, ‘मजा मा ‘ हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजन करणारा आहे. या चित्रपटात माधुरीशिवाय गजराज राव, ऋत्विक भौमिक, बरखा सिंग, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, शीबा चढ्ढा, सिमोन सिंग, मल्हार ठकार आणि निनाद कामत दिसणार आहेत.
श्रेया घोषाल या गाण्याविषयी बोलताना म्हणाली, “हे गाणे गाऊन मी खूप आनंदी आणि उत्साही आहे. मी खूप नशीबवान होते की, मी माझ्या कारकिर्दीतील पहिले गाणे माधुरी दीक्षितच्या ‘देवदास’ चित्रपटासाठी गायले आणि अर्थातच त्यानंतर मी आणखी बरीच गाणी गायली. ‘बूम पडी’ माझ्यासाठी आणखी खास आहे. कारण, हा माधुरीचा पहिला गरबा डान्स नंबर आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना हे गाणे आवडेल.”
माधुरी दीक्षितने यापूर्वीच ‘फेम गेम’ नावाच्या वेब सीरिजमधून डिजिटल पदार्पण केले आहे. नेटफ्लिक्सच्या या मालिकेत अभिनेत्रीसोबत संजय कपूर देखील दिसले हाेते. या मालिकेतील माधुरीचे पात्र लोकांना खूप आवडले होते. माधुरीच्या मागील चित्रपटांबद्दल बोलायचे, तर अभिनेत्री शेवटची करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटात दिसली होती. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता, जो बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करु शकला नाही.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तापसीला झालंय तरी काय? आधी फोटोग्राफर अन् आता पत्रकारांवर संतापली; म्हणाली, ‘अय भावा ओरडू नको’
‘मी काय जन्मत: सुंदर नव्हते, खराब मेकअपमुळे रडायचे’, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
‘जवान’ शाहरुख लईच बिझी! तब्बल 200 महिलांसोबत 7 दिवस करणार ‘हे’ काम, निर्मात्यांनी केली तयारी