Tuesday, June 25, 2024

घटस्फोटाच्या बातम्यांमध्ये, निक जोनासने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; शेअर केला फोटो

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील क्युट कपल्सपैकी एक मानले जाते. त्यांचा चाहतावर्ग भलामोठा आहे. या चाहत्यांसाठी हे दोघे नेहमी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची झलक शेअर करत असतात. मात्र काही दिवसांपासून या दोघांमधील मतभेदाच्या बातम्यांमुळे चाहते चांगलेच नाराज झाले होते. इतकेच नव्हे, तर प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या बातम्या देखील जोर धरून आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, निकने पत्नी प्रियांकासोबतचा एक फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा गोड फोटो शेअर करत निकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे को, “थँक्स गिविंगच्या शुभेच्छा. प्रियांका मी तुझी सदैव ऋणी राहीन.” (nick jonas post romantic photo with priyanka chopra amid divorce rumours)

केवळ निकच नव्हे, तर प्रियांकानेही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. जोडप्याने शेअर केलेला हा फोटो चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे. तसेच चाहते याला भरभरून प्रेम देत आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियाही देत आहेत. महत्वाचे म्हणजे, निक आणि प्रियांका आपापल्या कामातून ब्रेक घेऊन एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.

प्रियांका आणि निकची ही पोस्ट चाहत्यांसाठी एखाद्या चांगल्या बातमीपेक्षा कमी नाही. कारण त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने चाहते खूप नाराज झाले होते. खरं तर, काही दिवसांपूर्वी प्रियांकाने इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या नावासमोरून निकचे जोनास आडनाव हे काढून टाकले होते, ज्यामुळे दोघांमध्ये मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. मात्र असे नसून, दोघेही सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत आहेत आणि व्यावसायिकरित्या देखील एकमेकांना सपोर्ट करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा