Monday, October 2, 2023

बॉलिवूडमधून केली होती कारकिर्दीची सुरुवात, पण दाक्षिणात्य चित्रपटांनी दिली खरी ओळख; वाचा निधी अग्रवालबद्दल न ऐकलेल्या गोष्टी

दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे निधी अग्रवाल होय. निधी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधीपासूनच तिचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. ट्विटरवर अनेकजण तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. तिने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये तिची फॅन फॉलोविंग तयार केली आहे. सोशल मीडियावर ती सध्या ट्रेंडिंग अभिनेत्री आहे. अशातच तिचा वाढदिवस म्हटल्यावर तर तिच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाणच आले आहे.

निधी अग्रवालचा जन्म 17 ऑगस्ट 1993 हैदराबाद येथे झाला आहे. क्रिस्ट विद्यापीठातून तिने तिचे शिक्षण पूर्ण केले. या दिवसात ती तिच्या एक म्युझिक अल्बममुळे जोरदार चर्चेत आहे. या म्युझिक व्हिडिओचे नाव ‘साथ क्या निभाओगे’ हे आहे. यामध्ये ती सोनू सूदसोबत दिसली आहे. निधी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती एक पॅन इंडिया अभिनेत्री आहे. ती दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये खूप लोकप्रिय आहे. परंतु तरीही खूप कमी लोक तिला ओळखतात. खूप कमी लोकांनाच माहिती असेल की, तिने तिच्या करिअरची सुरुवात बॉलिवूडमधूनच केली होती. परंतु येथे ती काही खास नाव कमवू शकली नाही. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीकडे वाटचाल केली. (nidhhi agerwal celerbret her birthday, lets know about her)

निधी अग्रवालने 2017 मध्ये आलेल्या ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु हा चित्रपट फ्लॉप झाला. या चित्रपटात तिच्यासोबत टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होता. यानंतर तिला बॉलिवूडमध्ये काम मिळाले नाही. यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये वाटचाल केली. तिने 2018 मध्ये ‘सव्यासांची’ या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर तिने ‘मिस्टर मजनू’ आणि ‘इस्मार्ट शंकर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत काम केले. तिचे हे दोन्ही चित्रपट सुपरहिट होते.

निधीने या वर्षी जानेवारी महिन्यात ‘ईश्वरन’ या तमिळ चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे. याच दरम्यान तिचा ‘भूमी’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटाला काही खास प्रतिसाद मिळाला नव्हता.

अधिक वाचा- 
एकेकाळी ‘आशिकी’च्या कलाकारांनी केली होती सर्वांवर जादू; आता काय करतायेत ‘हे’ कलाकार?
श्रद्धाने केवळ टीव्हीच नव्हे, तर साऊथमध्येही वाजवलाय अभिनयाचा डंका; दोनदा साखरपुडा तोडून केलं होतं सर्वांना चकित

हे देखील वाचा