बॉलिवूडमधील आणखी एक क्यूट जोडी अडकणार विवाहबंधनात; पण लग्नावेळी पहिल्यांदाच ‘असं’ काहीतरी घडणार…

बॉलिवूडमधील आणखी एक क्यूट जोडी अडकणार विवाहबंधनात; पण लग्नावेळी पहिल्यांदाच 'असं' काहीतरी घडणार...


बॉलिवूडमधील निर्माते ‘जे.पी. दत्ता’ आणि अभिनेत्री ‘बिंदिया गोस्वामी’ यांच्या प्रेमाची कहानी तर सगळीकडेच लोकप्रिय आहे. त्यांच्या प्रेमकहाणीपासून ते लग्नाच्या सात फेऱ्यांपर्यंतचा प्रवास खूपच मजेशीर होता.

त्यातच आता त्यांच्या मुलीच्या लग्नाची गोष्ट सर्वांसमोर आली आहे. असे म्हटले जात आहे की, त्यांच्या मुलीचे लग्न 7 मार्च होणार आहे. मात्र, इतकेच नाही तर या होणाऱ्या लग्नाची पण एक खास बात आहे. जी आज आम्ही दैनिक बोंबाबोंबच्या प्रेक्षकांना सांगणार आहोत.

जे.पी. दत्ता आणि बिंदिया यांची मुलगी निधी, ही बिनॉय गांधी याच्यासोबत लग्न करणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निधी ही देखील त्याच ठिकाणी लग्न करणार आहे, जिथे तिच्या आई-वडिलांचे लग्न झाले होते. ती जयपूर मध्येच लग्न करणार आहे. त्याआधी 6 मार्चला तिचा संगीत कार्यक्रम करणार आहे.

एका इंग्लिश वेबसाईटवरून आलेल्या माहितीनुसार ही एक इतिहास घडवणारी गोष्ट आहे. जे. पी. दत्ता यांनी जयपूरला एका झाडाखाली बिंदिया यांना लग्नासाठी मागणी घातली होती. आणि निधी देखील त्याच झाडाखाली सात फेरे घेणार आहे. निधी जयपुरला आपले दुसरे घर मानते. लहान असताना ती नेहमी तिच्या आईसोबत जयपूर येत असे.

निधी आणि बिनाॉय यांनी मागच्या वर्षी 29 ऑगस्टला साखरपुडा केला आहे. डिसेंबरमध्ये ते लग्न देखील करणार होते. परंतू, कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता लग्नाला अधिक लोक येऊ शकणार नाही; ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी लग्न करण्याची तारीख पुढे ढकलली. निधीने आता तिच्या लग्नाच्या पत्रिका पाठवायला देखील सुरूवात केली आहे.

निधी आणि बिनॉय यांची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटासाठी निधीला निवडले होते. हा चित्रपट बिनॉय आपल्या एका जुन्या कंपनीसाठी बनवत होता. यानंतर निधी आणि बिनॉय खूप चांगले मित्र झाले. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले.


Leave A Reply

Your email address will not be published.