Saturday, July 6, 2024

भयावह! घरात घुसून ‘या’ अभिनेत्रीसोबत झाली लूटमार, ७ लाखांहून अधिक रक्कम लंपास

कोरोना महामारीमुळे सर्वत्र बेरोजगारी पसरली आहे. अशात उद्भवणाऱ्या उपासमारीमुळे चोरीचे प्रमाण देखील अधिकच वाढले आहे. पूर्ण आयुष्यभरची जमापुंजी एखाद्या दिवशी कोणीतरी भयंकर पद्धतीने चोरून जातं, ही खरंच एक भयानक बाब आहे. अशात कलाकारांना देखील अशा चोरींचा फटका बसल्याची एक घटना समोर आली आहे. अभिनेत्री निकिता रावलसोबत चोरीची घटना घडली आहे.

अभिनेत्री मुंबईची आहे. तिच्या काही कामानिमित्त ती नवी दिल्लीला तिच्या मावशीच्या घरी राहते. घरी कोणी नाही हे पाहून चोरांनी तिच्या घरामध्ये प्रवेश केला. मावशी बाहेर गेली असल्याने त्यावेळी ती एकटीच घरामध्ये होती. तेथील चोरांनी तिला बंदुकीचा धाक दाखवत तिच्याकडून तब्बल ७ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यामुळे अभिनेत्री खूप भयभीत झाली. (Nikita rawal burglary of rs 7 lakh at gunpoint in news delhi)

घडलेल्या घटनेची माहिती देत असताना तिने सांगितले की, “ते लोक तोंड झाकून आले होते. त्यामुळे मी त्यांचा चेहरा पाहू शकले नाही. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी स्वतःला एका कपाटामध्ये बंद करून घेतले. ही घटना माझ्या आयुष्यतील आतापर्यंतची खूप भयानक घटना होती. मी जर त्यांच्याशी लढले नसते, तर स्वतःच्या जीवाला देखील मुकले असते. त्यांनी माझ्या घरातून ७ लाखांचा मुद्देमाल चोरला आहे.”

निकिता रावल आहे तरी कोण?
निकिता ही एक ३१ वर्षीय अभिनेत्री आहे. तशी मूळची ती मुंबईची. तिने साल २००७ मध्ये ‘मिस्टर हॉट मिस्टर कूल’ मध्ये अभिनय केला आहे. तसेच साल २००९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘द हीरो-अभिमन्यु’मध्ये देखील ती झळकली होती. तसेच लवकरच ती अरशद वारसीच्या ‘रोटी कपड़ा और रोमांस’ या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनयासह ती एक उत्तम डान्सर देखील आहे. सोशल मीडियावर देखील तिचे अनेक चाहते आहेत.

निकिता गरजूंना कायमच सढळ हाताने मदत करत असते. अशात अभिनयासह ती एक ‘आस्था’ नावाची सामाजिक संस्था देखील चालवते. कोरोना काळात देखील तिने अनेकांना मदत केली आहे. तसेच गरिबी, लिंग भेदभाव आणि आपले स्वास्थ्य या विषयावर देखील ती अनेकांना मार्गदर्शन करते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच की! ‘अरुदीप’ची नवं गाणं आलं रसिकांच्या भेटीला; त्यांच्या जुगलबंदीने पुन्हा केलं सर्वांना प्रभावित

-खास मित्रासह अंडरवॉटर मजा करताना दिसली ‘सोनू’; बिकिनी लूकने तर सर्वांनाच केलंय चकित

-ट्रेंडिंग गाण्यावर ‘स्वीटू’नेही धरला ताल, गोड अदा पाहून तुम्हीही व्हाल फिदा

हे देखील वाचा