बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरू झाल्यापासूनच , निक्की व अरबाज यांची मैत्री प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडत होती. पण गेल्या भाऊच्या धक्क्यानंतर टीम ए मध्ये चांगली फूट पडल्याचे दिसून आले. निक्की एकटी खेळेल असे वाटत असतानाच, निक्की अभिजीतशी हात मिळवणी करते का काय असे चित्र सध्या घरात दिसत आहे.
घरातल्या दोन्ही ग्रुपला आधीपासूनच अभिजीत व निक्की मैत्री खटकत होती. दोन्ही टीमच्या सदस्यांनी त्यांच्याशी बोलून अडचण दूर करायचा प्रयत्न केला. तसेच भाऊच्या धक्क्यावर सुद्धा या गोष्टीवर अनेक चर्चा झालेल्या दिसून आल्या.
कालच्या भागात बिग बॉसच्या घरात एक नवीन कार्य रंगलेले दिसून आले. यात , अभिजीत व निक्की एका जोडीत बांधले गेले. कार्यादरम्यान बिग बॉस त्यांना विचारतात , ” अभिजीत तुम्हाला या परिस्थितीवर कुठले गाणं सुचते”? त्यावर अभिजीत म्हणतो, “हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले….” यानंतर घरात हशा पिकतो. या गाण्यानंतर अंकिता म्हणते , ” आज कळलं बिग बॉसच्या घरात जोड्या बांधलेल्या असतात ते…” त्यामुळे या कार्यादरम्यान निकी व अभिजीत घरातील इतर सदस्यांची एकत्र येऊन जिरवणार का हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
दरम्यान भाऊच्या धक्क्यानंतर घरातील सर्वच समीकरणे बदलताना दिसत आहे. टीम ए स्पष्टपणे तुटलेली दिसत आहे तर एकीकडे टीम बी मध्ये सुद्धा अभिजीतच्या काही गोष्टी इतर सदस्यांना आवडत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे निकी व अभिजीत यांची मैत्री अशीच पुढे टिकणार का? की घरातील इतर सदस्य त्यावर काही बोलतात का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
अभिजीत बरोबर निक्कीला हसताना पाहून अरबाज भडकला, घरात केली तोडफोड
राम चरणाने पत्नी आणि मुलीसोबत साजरी केली जन्माष्टमी, खास क्षणांचे फोटो व्हायरल