कलर्स मराठी वरील मराठी बिग बॉस चा पाचवा आठवडा जोरदार भांडणांनी सुरू झाल्याचे दिसून आले. आत्ताच झालेल्या भाऊच्या धक्क्याने टीम ए मध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. निक्की एका बाजूला तर अरबाज जान्हवी वैभव व घनश्याम एका बाजूला असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय निक्की आपण टीम ए सोडल्याचे देखील स्पष्टपणे सांगितले.
दरम्यानच्या काळामध्ये अभिजीत व निकी यांची मैत्री फुलताना दिसून आली. आता घराच्या पाचव्या आठवड्यामध्ये बिग बॉस ने एक नवीन कार्य सदस्यांवर सोपवले आहे. यामध्ये बिग बॉस ने ठरवून दिलेल्या जोड्यांनी आठवडाभर सोबत जोड्यांनी राहायचे आहे.
यामध्ये निकी व अभिजीत , आर्या व अरबाज , अंकिता व वर्षा उसगावकर , पॅडी कांबळे व घनश्याम , वैभव व डीपी , सुरज व जान्हवी अशा बिग बॉसने जोड्या ठरवून दिल्या आहेत. या कार्यात घरातील इतर सदस्यांबरोबर आपल्याला कामे करायची आहेत.
बिग बॉसने निकी व अभिजीतला एकत्र जोडीत ठेवल्यामुळे अरबाचा राग अनावर झालेला दिसला. यामुळे अरबाजने बिग बॉसच्या घरात राडा घातल्याचे दिसून आले. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे.
त्यात अभिजीत व निक्की एकत्र किचनमध्ये काम करताना दिसत आहे. त्या दोघांना हसत खेळत पाहून, अरबाज घरातील भांडी फोडल्याचे दिसून आले. त्यावर निक्की त्याला म्हणते, “काय बालिशपणा आहे हा”. तर अरबाज निक्की म्हणतो, “निक्की तू मला हर्ट करतीये”. या पुढे निक्की अरबाजला म्हणते , “मला तुझी गरज नाही…” ते ऐकून अरबाज चिडतो व घरातील इतर सामानाची तोडफोड करत असल्याचे दिसत आहे. घराच्या पाचव्या आठवड्यात कॅप्टन कोण होणार तसेच घराबाहेर कोण जाणार हे पाहणे नक्कीच मनोरंजक असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
या चित्रपटासाठी श्रद्धा होती पहिली पसंती; जाणून घ्या संपूर्ण यादी
राम चरणाने पत्नी आणि मुलीसोबत साजरी केली जन्माष्टमी, खास क्षणांचे फोटो व्हायरल