बिग बॉस म्हटलं कि चर्चेला उधाण आलंच. बिग बॉसच्या पाचव्या सिझन मध्येही सुरुवातीपासूनच अनेक नवनवीन गोष्टी आणि किस्से बघायला मिळत आहेत. घरात रोज नवनवीन रंजक गोष्टी घडत आहेत. आता घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात प्रेम निर्माण होऊ पाहतय. अरबाज ने निक्कीसाठी टोमॅटो हार्ट बनवलं होतं.त्यामुळे घरातील इतर सदस्य आता निक्कीला वहिनी म्हणून हाक मारत आहेत.
एका व्हिडीओत वैभव निक्कीला अरबाज कुठे आहे असे विचारतो. त्यावर निक्की म्हणते, मला काय माहित. मग वैभव तिला छेडत म्हणतो, तुम्हाला नाही माहित तर कोणाला माहित वहिनी… आणि मग निक्की लाजून घरात जाते. तिच्या मागे छोटा पुढारी देखील येतो. तो म्हणतो, वहिनीला वहिनी नाही म्हणणार तर मग काय म्हणणार ? मग घनश्याम निक्कीची फिरकी घेत गोरी गोरी पान, फुलासारखी छान … दादा मला एक वहिनी आण … पण वहिनी डांबरट नको … चांगल्या मनाची आण. त्याचं हे गाणं ऐकून निक्कीला धक्काच बसतो.
बिग बॉस मध्ये दररोज असेच नवनवीन किस्से घडत आहेत. पहिलं नॉमिनेशन देखील जवळ येत आहे. पुढे घरात काय काय गमती-जमती घडतात हे बघायला मजा येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
ॲक्शन सीन देखील रोमँटिक गाण्यासारखे वाटले, समंथाने सांगितले ‘सिटाडेल: हनी बनी’ चे अनुभव
अनुष्का शर्मानंतर परिणिती चोप्रा पोहोचली लंडनमधील इस्कॉन मंदिरात, देवाच्या भक्तीत झाली लीन