बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा ग्रँड फिनाले चालू झालेला आहे. या फिनालेमध्ये निक्की तांबोळी, सुरज चव्हाण आणि अभिजीत सावंत हे टॉप 3 स्पर्धक होते. अशातच आता या टॉप 3 मधून एक व्यक्ती घराबाहेर गेलेला आहे. यावेळी बॉलीवूडच्या जिगरा या चित्रपटाची टीम बिग बॉसच्या घरात आलेली आहे. आलिया भट्टने या बिग बॉस मधील तिसरे एलिमिनेशन केलेले असून निक्की तांबोळी तांबोळी ही घराबाहेर पडलेली आहे. आणि आता या शोला त्यांचे टॉप 2 स्पर्धक मिळालेले आहेत. आता सुरज चव्हाण आणि अभिजीत सावंत हे दोघेच बिग बॉसच्या घरात राहिलेले आहेत आता या दोघांपैकी कोण ट्रॉफी उचलणार यामध्ये चुरस रंगणार आहे.