तुरुंगात बसून २०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये बॉलीवूड सौंदर्यवतींची नावे सातत्याने समोर येत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची चौकशी केली आहे. पण या प्रकरणात आणखी 5 बॉलिवूड महिलांची नावे समोर येऊ शकतात. कोणत्या आहेत त्या अभिनेत्री चला जाणून घेऊ.
रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळी आणि चाहत खन्ना अशा अभिनेत्री आहेत ज्यांना सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. म्हणजेच जॅकलीन आणि नोरा यांच्यानंतर आता निक्की आणि चाहतही या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात जॅकलिनलाही ईडीने आरोपी केले आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुकेश दिल्लीच्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना निक्की आणि चाहत यांची भेट झाली.
निक्की तांबोळी, जिचे खरे नाव निकिता तांबोळी आहे, तिने पिंकी इराणीच्या माध्यमातून सुकेशशी भेट घेतली होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकी इराणी सुकेशच्या जवळची आहे. निक्कीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंकीने सुकेशची ओळख दक्षिण भारतीय निर्माता ‘शेखर’ म्हणून करून दिली होती. रिपोर्टनुसार, निक्की तिहार तुरुंगात सुकेशला दोनदा भेटली आहे.
ईडीने दाखल केलेल्या चार्टशीटमध्ये असे म्हटले आहे की, एप्रिल 2018 मध्ये सुकेशने पिंकीला 10 लाख रुपये दिले होते, त्यापैकी 1.5 लाख रुपये निक्की तांबोळीला दिले होते. दुसऱ्यांदा त्यांच्या पहिल्या भेटीनंतर काही आठवड्यांनंतर, ती एकटीच सुकेश चंद्रशेखरला भेटायला गेली तेव्हा तिला 2 लाख रुपये आणि एक गुच्ची बॅग देण्यात आली. 15 डिसेंबर 2021 रोजी निक्कीचे बयान नोंदवण्यात आले. पिंकीने व्हॉट्सअपवर संपर्क केल्याचेही निक्कीने सांगितले. त्यामुळे या प्रकरणात आता निकीचेही नाव समोर येत आहे.
हेही वाचा – दोन दाक्षिणात्य दिग्गजांनी ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या यादीमध्ये मिळवले स्थान? चाहत्यांमध्ये आनंदाची लाट
महाराष्ट्रात राडा घालायला ‘राडा’ सिनेमा सज्ज, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
प्रियांका आधी ‘या’ हॉलिवूड सुंदरी होत्या निक जोनासच्या गर्लफ्रेंड, वाचा यादी