सेलिब्रिटींना विविध ठिकाणी स्पॉट करण्यासाठी नेहमी पॅपराजी त्यांच्या मागे नेहमी असतातच. कलाकरांना विविध ठिकाणी स्पॉट करून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ घेऊन, त्या संदर्भातल्या बातम्या फॅन्सपर्यंत पुरवण्याचे काम हे पॅपराजी करतात. अगदी चित्रपटातील कलाकारांपासून ते टीव्ही, रियॅलिटी शोमधील सेलेब्रिटीपर्यंत सर्वांनाच ते फॉलो करतात.
बिग बॉस फेम निक्की तांबोळीला नुकतेच मुंबईमध्ये पॅपराजींनी स्पॉट केले. काळ्या रंगाचा टॉप आणि डेनिम शॉर्ट्समध्ये निक्कीला फोटोग्राफर्सने लोखंडवाला येथे स्पॉट केले. यावेळी निक्कीने सर्वाना हाय म्हणत, कोणतेही आढेवेढे न घेता सर्वाना फोटो काढू देत, विविध पोझ देखील दिल्या. निक्कीचे फोटोग्राफर्ससोबतचे हे फ्रेंडली वागणे सर्वांनाच आवडले असून, याचा एक व्हिडिओ ‘वूंपला’ने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
निक्की तांबोळी मागील काही काळापासून सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. ‘बिग बॉस १४’ मध्ये स्पर्धक म्हणून निक्की सहभागी झाली आणि तिचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. बिग बॉस आधी तिची मर्यादित असलेली प्रसिद्धी बिग बॉस नंतर अचानक मोठ्या प्रमाणात वाढली आणि तिला मोठी ओळख मिळाली. तिच्या या प्रसिद्धीचा फायदा होत, तिला लगेचच ‘खतरों के खिलाडी’ हा शो देखील मिळाला. निक्की लवकरच सुरु होणाऱ्या ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये स्टंट्स करताना दिसणार आहे.
निक्की ही मूळची औरंगाबादची असून, ग्लॅमर जगात ओळख मिळवण्यासाठी तिने मुंबई गाठली. ती तामिळ आणि तेलगू सिनेइंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे. ती राघव लॉरेन्सच्या ‘कंचना ३’ मध्ये झळकली आणि तुफान हिट झाली. त्यानंतर ती बिग बॉसमध्ये आली आणि तिला लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये ती टॉप ३ पर्यंत पोहचली होती.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असणारी निक्की, अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










