Monday, May 13, 2024

दुःखद: प्रसिद्ध सुफी गायक मनमीत सिंग याचा नाल्यात बुडून मृत्यू; मृतदेह पोलिसांच्या ताब्यात

मनोरंजन सृष्टीतून अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. पंजाबचा प्रसिद्ध सुफी गायक मनमीत सिंग याचा मृतदेह करेरी तलावाजवळ सापडला आहेे. तो याठिकाणी फिरण्यासाठी आला होता. मात्र मुसळधार पावसामुळे तिथे पूर आला आणि त्याच पूरात तो वाहून गेला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच पोलिसांनी रात्री मृतदेह धर्मशाळा रुग्णालयात पाठविला असून, आज पोस्टमार्टमनंतर त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल.

धर्मशाळा परिसरात ढगफुटीच्या घटनेनंतर मनमीत सिंग बेपत्ता होता. त्यानंतर मंगळवारी (१३ जुलै) संध्याकाळी करेरी गावातून त्याचा मृतदेह सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मनमीत सिंग आणि त्याचा भाऊ कर्णपाल आणि त्यांचे इतर चार मित्र धर्मशाळेत गेले होते. रविवारी सर्वजण इथल्या करेरी तलावाजवळ फिरण्यासाठी गेले होते. मात्र रात्री मुसळधार पावसामुळे त्यांना तिथेच थांबावे लागले. सोमवारी हे सर्वजण परत येत असताना, तलाव ओलांडताना मनमीत सिंग पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेला. (kangra famous punjabi singer manmeet singh dead body recovered near kareri lake)

कांगरा जिल्हा वरिष्ठ पोलिस अधीक्षक विमुक्त रंजन यांनी सांगितले की, अमृतसर येथील रहिवासी मनमीत सिंग करेरी तलावाजवळ बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती. मनमीत सिंगला शोधण्यासाठी एक पथक रवाना झाले होते. सायंकाळी मदत पथकाच्या साहाय्याने मनमीत सिंगचा मृतदेह सापडला. आता पुढचा तपास सुरू आहे.

मनमीत सिंगचा सिंगिंग ग्रुप ‘सेन ब्रदर्स’च्या नावाने प्रसिद्ध आहे. तो देश-विदेशात त्यांच्यासोबत कार्यक्रम करत असायचा. मनमीत सिंगच्या निधनाने त्याचे चाहते अत्यंत दु:खी झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा