Wednesday, July 3, 2024

निरहुआची राजकारणात एंट्री: पत्रकाराला शिवीगाळ, एअरहोस्टेसशी गैरवर्तन ‘या’ कारणांमुळे चर्चेत होता अभिनेता

निरहुआ (Dinesh Lal Yadav) हा भोजपुरी सिनेमा जगतातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने चित्रपट जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयात नाव कमावल्यानंतर निरहुआने आता राजकारणात एंट्री केली आहे. नुकतेच भारतीय जनता पक्षाकडुन निरहुआला आझमगड आणि रामपुर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादवची राजकीय सुरूवात कशी होते याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पण राजकारणातील एंट्रीआधी निरहुआ अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. कोणते आहेत ते निरहुआचे गाजलेले वाद चला जाणून घेऊ. 

एअर होस्टेससोबत केले होते गैरवर्तन – निरहुआचा २०१७ मधील हा वाद चांगलाच गाजला होता. यावेळी लंडनमध्ये एका चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावरुन माघारी परतत असताना दारुच्या नशेत निरहुआने एअर होस्टेस सोबत हुज्जत घालत गैरवर्तन केले होते. त्यानंतर त्याला सहप्रवाशांनी समजवल्यानंतर त्याला एअर होस्टेसची माफी मागावी लागली होती. त्यामुळेच त्याच्यावर पोलिस कारवाई केली गेली नाही.

बिगबॉसमधील वाद – अभिनेता निरहुआने २०१२ मध्ये सलमान खानच्या बिग बॉस ६ मध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमातही निरहुआने दमदाटी करत वाद ओढवून घेतला होता. या कार्यक्रमात इमाम ए सिद्दीकी सुद्धा सहभागी झाला होता. या दोघांमध्येच मोठा वाद कार्यक्रमात पाहायला मिळाला होता. इतकेच नव्हेतर निरहुआने त्याला तोंंड बंद केल नाहीस तर जीव मारुन टाकीन अशीच धमकी दिली होती. या वादामुळेच त्याला कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले होते.

पत्रकाराला शिवीगाळ – काही वर्षांपुर्वी निरहुआचा बॉर्डर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.त्याचसोबत सलमान खानचा रेस ३ चित्रपट  प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. याउलट निरहुआचा चित्रपट चांगलाच सुपरहीट ठरला होता. त्यामुळेच एका पत्रकाराने सलमान खानच्या चित्रपटाची खिल्ली उडवली होती. हा प्रकार समजल्यानंतर संतापलेल्या निरहुआने त्या पत्रकाराला शिवीगाळ केली होती.

हे देखील वाचा