Thursday, March 28, 2024

Sidhu Moosewala Murder | मिका सिंगने उघड केली पंजाबमधील गुंडांची भीती; म्हणाला, ‘पैशासाठी अनेक गायक…’

काही दिवसांपूर्वी सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moosewala) निर्घृण हत्येने संपूर्ण पंजाबी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला हादरवून सोडले. त्याच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या मृत्यूच्या दु:खात सर्वजण बुडाले असतानाच, दुसरीकडे त्याच्या हत्येप्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत. या २८ वर्षीय प्रसिद्ध पंजाबी गायकाला गुंडांकडून सतत धमक्या दिल्या जात होत्या आणि त्याच्या मृत्यूमागे गुंडांचाच हात आहे. त्याच्या हत्येनंतर आता पंजाबच्या इतर प्रसिद्ध गायकांनाही गुंडांकडून धमक्या दिल्या जात असल्याच्या बातम्या येत आहेत. या बातम्यांसोबतच अशी एक घटनाही समोर आली आहे, ज्यामुळे या बातम्यांमध्ये तथ्य असू शकते. दरम्यान पंजाबी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक मिका सिंगची (Mika Singh) सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासोबतच मिका सिंगने गुंडांकडून सेलिब्रिटींना मिळणाऱ्या धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

पाकिस्तानी गायकांनाही मिळतात धमक्या 
सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूवर शोक व्यक्त केल्यानंतर आता मिकाने इतर पंजाबी गायकांना मिळालेल्या धमक्यांचा खुलासा केला आहे. एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत या घटनेचा आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींचा खुलासा करताना मिकाने सांगितले की, “इंडस्ट्रीतील प्रत्येक व्यक्तीला या दुःखद घटनेने धक्का बसला आहे. पण मी सर्वांना सांगू इच्छितो की, केवळ सिद्धूलाच धमकी देण्यात आली नव्हती. गिप्पी ग्रेवाल, मनकिरत औलख यांसारख्या अनेक पंजाबी गायकांना धमक्या आल्या आहेत. या घटनेनंतर आपण सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे.” (Mika singh reaction on sidhu moosewala murder)

सहा वर्षांहून अधिक काळ आहे सक्रिय  
मिका आपला मुद्दा पुढे करत म्हणाला, “गुंड पैसे मागतात. जो पैसे देतो तो ठीक. नाहीतर ते त्यांना धमकी देतात. पंजाबमधील गायकांना अनेकदा गुंडांकडून धमक्या भेटतात. बऱ्याच गायक यामुळे चिंतेत आहेत. जसे गायक थोडे लोकप्रिय होतात किंवा त्यांचे शो चालायला लागतात, तेव्हा त्यांना धमक्या येऊ लागतात. पूर्वी मुंबईत अंडरवर्ल्डचे नाव ऐकायला यायचे. पण आता अंडरवर्ल्डच पंजाबमध्ये सुरू झाले आहे.”

मिका सिंग आजकाल त्याच्या ‘मिका दी वोटी’ या रियॅलिटी शोमुळे खूप लाइमलाइटमध्ये आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा