Thursday, April 24, 2025
Home अन्य ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्यावर पत्नीने लावला बँकेतून ‘इतके’ कोटी रुपये काढल्याचा आरोप

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्यावर पत्नीने लावला बँकेतून ‘इतके’ कोटी रुपये काढल्याचा आरोप

मागील काही दिवसांपासून टीव्ही अभिनेता करण मेहरा वादात अडकला आहे. त्याच्याविरुद्ध पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तक्रारीत अभिनेत्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाचाही समावेश होता. अभिनेत्यावर पत्नीच्या बँक अकाऊंटमधून कोट्यवधी रुपये काढल्याचाही आरोप आहे. (Nisha Rawal Claims Husband And Actor Karan Mehra Withdraw RS 1 Crore From Her Account)

निशा रावलच्या तक्रारीवर करण मेहरा आणि कुटुंबावर गुन्हा दाखल
एएनआयच्या वृत्तानुसार, गोरेगाव पोलिसांनी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबातील अजय मेहरा, बेला मेहरा आणि कुणाल मेहरा या सदस्यांवरही मारहाण आणि जाणीवपूर्वक छळ केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

निशाने लावला अकाऊंटमधून १ कोटी रुपये काढल्याचा आरोप
निशाने आपल्या तक्रारीत करणवर तिच्या अकाऊंटमधून १ कोटी रुपये काढल्याचा आरोपही लावला आहे. पोलिसांनी म्हटले की, ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच अभिनेत्याला अटक केली आहे. निशाने तिला त्या दिवशी पतीने मारहाण केल्याचा आरोप लावल्यानंतर पोलिसांनी करणला आधी ३१ मेच्या रात्री अटक केली होती. त्यानंतर त्याला १ जूनला लगेच जामीनावर सोडले होते.

पीटीआयच्या वृत्तानुसार, निशाने मेहरावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला आहे. याव्यतिरिक्त अभिनेत्याने असा दावा केला आहे की, ‘निशाने पोटगीच्या चर्चेदरम्यान त्याला फसवण्यासाठी भिंतीवर डोके आपटले होते.’ गोरेगाव पोलिसांना त्यांच्या नियंत्रण कक्षातून ३१ मे रोजी रात्री जवळपास ११ वाजता घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस अभिनेत्याच्या घरी गेले आणि करणला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले.

निशाने माध्यमांशी बोलताना करणवर फसवणूक आणि अपमानास्पद व्यवहाराचाही आरोप लावला होता.

तिने म्हटले होते की, “ते चिंतेत पडले आणि खोलीतून बाहेर गेले. त्यानंतर त्यांनी माझे डोके पडकले आणि मला भिंतीवर ढकलले. जेव्हा रक्त येऊ लागले, तेव्हा मला जाणवले की, काय झाले होते. त्यानंतर मी पोलिसांना फोन केला.”

निशा आणि करणचे लग्न २४ नोव्हेंबर, २०१२ मध्ये झाले होते. त्यांना ४ वर्षांचा मुलगा काविश आहे. त्याचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला होता. दोघांनीही आपापल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.

करण मेहराने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्यात ‘पवित्र रिश्ता’, ‘बदमाशियां’, ‘बदमाशियां’, ‘ब्लडी मनी’, ‘लव्ह स्टोरी’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांचा समावेश आहे. त्याला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. विशेष म्हणजे टीव्हीवरील सर्वाधिक काळ चालणारी मालिका म्हणून ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ओळखले जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्का शर्माचा कौतुकास्पद निर्णय; ‘या’ कारणामुळे ऑनलाईन विकणार प्रेग्नंसीमधील कपडे

-अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या शिरपेचात मानाचा तुरा, राज्यपालांच्या हस्ते ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कारा’ने केले सन्मानित

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

हे देखील वाचा