Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

देसाईंच्या निधनानंतर मनसे नेत्याचे धक्कादायक विधान! म्हणाले, ‘शूटिंग रद्द केल्या जायच्या…’

‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं कला दिग्दर्शनाचं काम करणारे नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी वयाच्या 58व्या वर्षी आत्म’हत्या करत जगाचा निरोप घेतला. ते मुंबईजवळील कर्जतच्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये मृत अवस्थेत आढळले. देसाईंच्या निधनाने हिंदी व मराठी फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अशात मनसे नेत्याने याविषयी मोठे भाष्य केले आहे.

नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मराठी, हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केलं. अनेक ऐतिहासिक मालिका व महानाट्यांसाठीही नितीन देसाई यांनी उभारलेले सेट प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. दरम्यान, नितीन देसाई यांना त्यांच्या उत्तुंग कारकीर्दीमध्ये 4 वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय, त्यांना 3 फिल्मफेअर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे. दरम्यान, तरीही नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल का उचलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जितेंद्र पाटील यांचा खुलासा
या पार्श्वभूमीवर मनसेचे रायगड अध्यक्ष जितेंद्र पाटील (Jitendra Patil) यांनी खुलासा केला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, निर्माते-दिग्दर्शकांवर दबाव टाकला जायचा. टीव्ही 9शी बोलताना ते म्हणाले की, “खरं तर, खूप दिवसांपासून एनडी (ND Studio) स्टुडिओकडे येणाऱ्या शूटिंग रद्द केल्या जायच्या. त्या कोण रद्द करायचं? निर्माते-दिग्दर्शकांवर कोण दबाव टाकायचं? हा मोठा प्रश्न आहे. इतका मोठा प्रसिद्ध स्टुडिओ चालवताना त्यांना शूटिंगची कामं मिळणं महत्त्वाचं होतं. पण ते येणं कुणामुळे बंद झालं नक्की या मागे कोण आहे? याचा शोध घेणे गरजेचे आहे.”

‘मागील काही दिवसांपासून होते अस्वस्थ’
जितेंद्र पाटील यांनी देसाई अस्वस्थ असल्याचेही सांगितले. ते म्हणाले की, “मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. ते वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करायचे. आर्थिक अडचणी होत्याच, पण त्यांच्याच कला क्षेत्रातून काही प्रसिद्ध व्यक्तींकडून एनडी स्टुडिओला शूटिंग येऊ दिल्या जात नव्हत्या. हे सर्व ते माझ्याशी बोलायचे. मात्र, या सर्व गोष्टी खूपच क्लेशदायक आहेत.”

देसाईंवर होतं 252 कोटींचं कर्ज
नितीन देसाई यांच्यावर 252 कोटींचे कर्ज (Nitin Desai 252 Crore Loan) होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्यांनी  180 कोटी रुपयांच्या कर्जासाठी आपली काही जमीन गहाण ठेवली होती. त्यानंतर त्यांच्या कर्जाची रक्कम वाढून 252 कोटी रुपये झाली होती. स्थानिक माध्यमांतील वृत्तांनुसार, काही महिन्यांपूर्वी फायनान्स कंपनीने एनडी स्टुडिओ (ND Studio) ताब्यात घेण्यासाठी रायगडच्या जिल्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. या बातमीमुळे त्यांना खूपच टेन्शन आले होते. माध्यमांमध्ये असे म्हटले जात होते की, ते कर्ज वसूल करणाऱ्या कंपनीमुळे खूपच चिंतेत होते. (Nitin deasi suside case,MNS jitendra patil open stodio secret)

हेही वाचा-
‘तू इतकी टोकाची भूमिका का घेतलीस…’, नितीन देसाईंच्या निधनावर हळहळला सुबोध भावे
मराठी दिग्दर्शकाची आत्म’हत्या, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे देखील वाचा