Wednesday, July 3, 2024

महाभारत फेम नितीश भारद्वाज यांच्या आरोपावर आता IAS पत्नीची प्रतिक्रिया, म्हणाली…

प्रसिद्ध मालिका ‘महाभारत’मध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेता नितीश भारद्वाज (Nitish Bhardvaj) सध्या वैयक्तिक जीवनामुळं चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी IAS पत्नी स्मिता घाटे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. इतकेच नव्हे तर पोलिसांत धाव घेत स्मिता यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होता. दरम्यान, आता पत्नी स्मिता घाटे यांनी यासर्वावर प्रतिक्रिया दिली आहे.

स्मिता घाटे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्या निवदेनात त्यांनी माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. भारद्वाज यांनी पत्नीवर मानसिक छळाचा गंभीर आरोप केला होता. तसेच, भारद्वज यांनी त्यांच्या जुळ्या मुली देवयानी आणि शिवरंजनी यांना भेटू देत नसल्याचा आरोपही केला होता.

काय म्हणाल्या आहेत स्मिता घाटे?
मी नितीश भारद्वाज यांची पत्नी स्मिता भारद्वाज आहे. मला माझ्या अल्पवीयन जुळ्या मुली देवयानी आणि शिवरंजनी यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मीडिया आणि जनतेसमोर माझी बाजू मांडण गरजेचं वाटतं. माझे पती नितीश भारद्वाज यांनी माझ्यावर माध्यमांसमोर खोटे आरोप केले आहेत. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी आरोप करत असल्याचे स्मिता यांनी म्हटलं आहे.

मुलींशी संपर्कात नसल्याचा नितीश यांनी केलेला दावा दिशाभूल करणारा आहे. कारण, यापूर्वी त्यांनी माझ्याशी व मुलींशी लँडलाईन नंबरवर संवाद साधला आहे. याबद्दल त्यांनी कौटुंबिक न्यायालयासमोर देखील कबुली दिली आहे. तसेच न्यायालयीन कामकाज आणि मुलांशी संबंधित प्रकरणांशी संवाद साधण्यासाठी एक ई-मेल आम्ही वापरत आहोत.

गेल्या अनेक दिवसांपासून ते त्या ई-मेल आयडीद्वारे आमच्याशी संपर्कात आहेत. असे असूनही त्यांनी ८ व ९ फेब्रुवारी २०२४ रोजी जाणीपूर्वक त्या संबंधित ई-मेलवरून संवाद साधणं बंद केलं. या सगळ्यापासून त्यांनी मला अनभिज्ञ ठेवलं. तसेच ते माझ्याशी एसएमएसद्वारे संवाद साधू शकतात. मी त्यांना ब्लॉक केलेलं नाही. याचा पुरावा माझ्या फोनवरून १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजून २१ मिनिटांनी त्यांना पाठवलेल्या मेसेजमधून मिळतो. तो मेसेज मी त्यांना पाठवला होता.”

तसेच त्या पुढे म्हणाल्या, जर नितीश भारद्वाज यांनी मुलींबद्दल खरोखरच चिंता व्यक्त केली असेल, तर त्यांच्याकडे माझ्या कायदेशीर प्रतिनिधीशी आणि इतर जवळच्या लोकांशी संपर्क साधण्याचा पर्याय होता. तसेच ते कुटुंबातील कुणाशीही संपर्क साधू शकले असते, पण त्यांनी असे कोणतेही प्रयत्न केलेले नाही. माध्यमांसमोर माझ्यावर छळ, मानसिक त्रास असे आरोप करत माझी प्रतिमा मलीन करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे स्मिता घाटे यांनी म्हटले आहे.

भारद्वाज यांनी तक्रारीत काय म्हटले होते?
भारद्वाज यांनी भोपाळ पोलिस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांच्याशी 14 फेब्रुवारी रोजी याप्रकरणी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्नीविरोधात लेखी तक्रार दिली. या तक्रारीमध्ये त्यांनी स्मिताने त्यांना त्यांच्या जुळ्या मुली देवयानी आणि शिवरंजनी यांना भेटू देत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच, मानसिक छळाचा गंभीर आरोप भारद्वाज यांनी केला आहे. पोलिसांना याचा तपास करण्याची विनंती केली आहे.

नितीश यांनी त्यांच्या एका जुन्या मुलाखतीत घटस्फोट हे मृत्यूपेक्षाही वेदनादायी असल्याचे सांगितले होते. घटस्फोटाबाबत बोलताना ते म्हणाले होते की, ‘होय, आम्ही फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. आमच्या विभक्त होण्याचे खरे कारण काय आहे. मला त्या तपशीलात जायचे नाही. आमचा खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे. नितीश आणि स्मिता यांचे हे दुसरे लग्न आहे. मनिषा पटेल ही त्यांची पहिली पत्नी होती. त्यांचे लग्न १९९१ मध्ये झाले होते. २००५ मध्ये दोघे वेगळे झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सलमान खान नंतर आता कुटुंबासह त्याच्या बहिणीच्या नवऱ्यालाही कडक सुरक्षा; काय आहे कारण?
‘मला चित्रपट करण्यात रस नाही, माझी काळजी करू नका’ आयेशा टाकियाने मांडले मत

हे देखील वाचा