चंदिगड विद्यापीठात नुकतीच घडलेली एमएमएस घटना लक्षात घेऊन आईएएस अधिकारी अभिषेक सिंग यांनी युनायटेड बाय ब्लड या एनजीओ अंतर्गत नो शेम मूव्हमेंट हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि अमृता फडणवीस यांच्यानंतर आता या उपक्रमाला सारा अली खान हिने पाठिंबा दिला आहे.
सारा अली खानने केला सपाेर्ट
आयएएस अधिकाऱ्याने सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत, ज्या मुलींच्या संमतीशिवाय त्यांचे फाेटाे शेअर करताता, त्या असुरक्षित मुलींना सक्षम करण्यासाठी उपयुक्त पावले उचलली जातील, ज्याला रिव्हेंज पॉर्न असेही म्हटले जाते. नो शेम मुव्हमेंट अंतर्गत मुलींना योग्य ते कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांना मदत करण्याबरोबरच मानसिक समुपदेशनही करण्यात येणार आहे. समजात असे सहसा पाहायला मिळेत की, मुली घाबरुन किंवा स्व:ताच्या लाजेमुळे तक्रार करायला जात नाहीत आणि या भीतीमुळे ते त्यांच्या पालकांना देखील सांगत नाहीत.
या मोहिमेच्या कार्यक्रमात अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) पाहुणी म्हणून आली होती, जिथे तिने हा उपक्रम मुलींसाठी खूप उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. त्याचवेळी साराचा आयएएस अधिकारी अभिषेक सिंग (abhishek singh) सोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे.
अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिच्या आगामी ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात ती स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. उषा मेहता यांनी स्वातंत्र्य लढ्यादरम्यान एक सीक्रेट रेडियो सर्विस कांग्रेस रेडियो सेवा सुरू केली होती, ज्यावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती.
View this post on Instagram
साराच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर सारा ‘ए वतन मेरे वतन’ व्यतिरिक्त लक्ष्मण उकेता यांच्या ‘अनटाइटल्ड’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री शेवटची ‘अतरंगी रे या’ चित्रपटात दिसली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
आलिया भट्ट ‘या’ रुग्नालयात देणार बाळाला जन्म! कपूर कुटुंबीयांनी बाळाच्या आगमनासाठी…
‘गर्दीतून वाट काढताना अचानक अमोलभाऊ अशी हाक कानावर येते’, अमोल कोल्हेंच्या पोस्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव