Monday, June 23, 2025
Home कॅलेंडर लग्नानंतर विमानातून परत येताना गौहरला खानला भेटला जुना बॉयफ्रेंड, अन् मग…

लग्नानंतर विमानातून परत येताना गौहरला खानला भेटला जुना बॉयफ्रेंड, अन् मग…

बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन सुरु झाला आणि एक एक जोड्या लग्नाच्या बंधनात अडकत गेल्या. या यादीत नुकतेच गौहर खान आणि जैद दरबार यांचे नाव सामील झाले आहे. या जोडीने २५ डिसेंबर २०२० ला या जोडीने निकाह केला. लग्नाच्या दोनच दिवसांनी गौहर तिच्या कामावर परतली आहे. निकाहच्या दोन दिवसानंतर ती लखनऊला चित्रीकरणासाठी रवाना झाली. यावेळी तिचा पती जैद तिला सोडायला विमानतळावर आला होता.

गौहरच्या या विमान प्रवासात तिच्या सोबत एक विचित्र योगायोग घडून आला. विमानात गौहर आणि कुशल टंडन यांची भेट झाली. ही भेट चर्चेत येण्याचे कारण म्हणजे कुशल आणि गौहर रिलेशनशिपमध्ये होते. बिग बॉसच्या ७ व्या पर्वात या दोघांची भेट झाली आणि तिथून ते पुढे एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र काही काळाने या दोघांमध्ये काहीतरी बिनसले आणि त्यांचे नाते संपुष्टात आले. पण अचानक त्याची रविवारी विमानात भेट झाली.

यावेळी कुशलने एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात त्याने, “मी माझ्या घरी जात होतो आणि अचानक माझी माझ्या जुन्या मैत्रिणीशी भेट झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे तिचे नुकतेच लग्न झाले आहे आणि ती आता खूप सुंदर दिसत आहे. माझी ही मैत्रीण आहे गौहर खान. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. हाय किस्मत” असे त्याने या व्हिडिओत म्हटले आहे.

या व्हिडिओ पोस्ट करताना त्याने ‘एक हसीन इत्तेफाक, शादी मुबारक गौहर खान’, असे शीर्षक दिले आहे.
कुशल आणि गौहर यांचे ब्रेकअप झाल्यानंतर गौहर आणि जैद यांची भेट झाली आणि ते प्रेमात पडले. नृत्यदिग्दर्शक असलेला जैद हा यूटुबर देखील आहे. जैद हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. या दोघांचे लग्न सोशल मीडियावर खूप गाजले. या दोघांच्या जोडीला त्यांच्या फॅन्सने भरभरून प्रेम दिले.

हे देखील वाचा