Friday, March 20, 2026
Home बॉलीवूड मोठी बातमी! ईडीकडून नोरा अन् जॅकलिनला समन्स; २०० कोटींच्या खंडणी प्रकरणी अभिनेत्रींची कसून चौकशी

मोठी बातमी! ईडीकडून नोरा अन् जॅकलिनला समन्स; २०० कोटींच्या खंडणी प्रकरणी अभिनेत्रींची कसून चौकशी

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वीच सुकेश चंद्रशेखरला २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी अटक केली होती. सध्या तो तुरुंगात आहे. या प्रकरणी आता बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावे समोर येत आहेत. अशात सध्या नोरा फतेहीचे नाव देखील समोर आले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने नोराला समन्स बजावला. त्यानंतर गुरुवारी (१४ ऑक्टोबर) ती ईडी कार्यालयात दाखल झाली. सध्या अभिनेत्रीची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी तिच्या कडून आंतरराष्ट्रीय पातळीवर सुकेशने आणखीन काही उलाढाल केली आहे का? याची माहिती मिळणार असल्याचा अंदाज ईडीला आहे.

सध्या या प्रकरणी ईडीची नजर सर्वच कलाकारांवर आहे. सुरुवातीला यामध्ये जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आले होते. त्यावेळी जॅकलिनला ईडीने समन्स बजावत तिची चौकशी केली. नंतर सुकेशने नाव बदलून जॅकलिनशी फोनवरुन संपर्क साधल्याचे समोर आले होते. तसेच जॅकलिन देखील म्हणाली होती की, “मला या प्रकरणी सुकेशने फसवले आहे.” आता तिला पुन्हा एकदा शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी आदिती यांच्याकडून २०० कोटींची खंडणी वसूल केल्या प्रकरणी सुकेश पोलिसांच्या अटकेत आहे. तसेच या मध्ये त्याची पत्नी लीना पॉलचा देखील हात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ती देखील सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. तसेच आणखीन चार व्यक्तींना या प्रकरणी अटक केलेली आहे.

सध्या ईडी कार्यालयात अभिनेत्री नोराची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता या प्रकरणी आणखीन कोणता खुलासा होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. नोरा आणि जॅकलिन या प्रकरणी महत्त्वाच्या साक्षीदार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुखच नाही, तर त्याच्यासारखा दिसणारा व्यक्तीही संकटात; आर्यनच्या अं’मली पदार्थ प्रकरणानंतर मिळत नाहीये काम

-ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा किंग खानला पाठिंबा; म्हणाले, ‘…इंडस्ट्रीमध्ये सर्व भित्र्या व्यक्ती’

-सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

हे देखील वाचा