Tuesday, July 9, 2024

दिग्दर्शकाच्या ‘त्या’ बोलण्याने ढसाढसा रडली होती नोरा फतेही, इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय

बॉलिवूडच्या उत्कृष्ट डान्सर्सपैकी एक नोरा फतेहीला (nora fatehi) आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नोराने फार कमी वेळात इंडस्ट्रीत जे स्थान मिळवले आहे ते कौतुकास्पद आहे. मात्र, नोराने परदेशातून भारतात येऊन केवळ बॉलिवूडमध्ये नाव कमावले नाही, तर स्वत:ची ओळख निर्माण करणेही सोपे नव्हते. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, स्ट्रगलच्या दिवसांमध्ये तिला खूप नकार आणि अपमानाचा सामना करावा लागला होता. आज आम्ही तुम्हाला नोराच्या स्ट्रगलिंग डेजमधील एक किस्सा सांगणार आहोत, ज्याचा उल्लेख खुद्द नोराने एका मुलाखतीत केला होता.

नोराच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती इंडस्ट्रीत नवखी होती, तेव्हा तिला एका कास्टिंग डायरेक्टरने तिच्या ऑडिशनच्या नावाने बोलावले होते. नोरा म्हणते की, त्या महिला कास्टिंग डायरेक्टरने तिला घरी बोलावले आणि खूप काही सांगितले.

या कास्टिंग डायरेक्टरने तर ‘तुमच्यासारखे अनेक लोक इथे आहेत, तुमच्यासारख्या लोकांमुळे इंडस्ट्रीला कंटाळा आला आहे, आम्हाला तुमच्यासारखी माणसं नकोत’ असं म्हटलं होतं. कास्टिंग डायरेक्टरचे म्हणणे ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे नोरा म्हणते.

नोराच्या म्हणण्यानुसार, तिला सुरुवातीला हिंदी कसे बोलावे हे देखील माहित नव्हते, त्यामुळे तिची खूप खिल्ली उडवली गेली. मात्र, बाहुबली चित्रपटातील आयटम साँगमध्ये दिसलेल्या नोराने त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही आणि आज तिची गणना इंडस्ट्रीतील टॉप डान्सर्समध्ये केली जाते.(nora fatehi cried when a casting director misbehaved with her during struggling days)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रीतीच्या लग्नासाठी कबीर सिंगची जैसलमेरला धाव, पाहाच व्हायरल व्हिडिओ

रवी किशनच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तिने गमावले प्राण

हे देखील वाचा