Wednesday, November 13, 2024
Home कॅलेंडर Dilbar Song | गाण्यासाठी नोरा फतेहीला करावा लागला अनेक अडचणींचा सामना, मात्र रिलीजनंतर तिचे…

Dilbar Song | गाण्यासाठी नोरा फतेहीला करावा लागला अनेक अडचणींचा सामना, मात्र रिलीजनंतर तिचे…

नोरा फतेहीचे (Nora Fatehi) ‘दिलबर’ गाणे रिलीझ होऊन ४ वर्षे पूर्ण झाली आहे. नोरा फतेहीला बॉलिवूडची डान्सिंग क्वीन म्हटले जाते. अल्पावधीतच तिने इंडस्ट्रीत नाव कमावले आहे. ‘दिलबर’ या गाण्यातूनच तिला हे स्थान मिळाले. हे गाणे रिलीझ झाले, तेव्हा नोराचे नशीब सोन्यासारखे चमकले. मात्र, प्रत्येक गोष्ट सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, असे ती सांगते. असाच किस्सा या गाण्याबाबतही घडला आहे. आज हे गाणे रिलीज होऊन ४ वर्षे झाली आहेत. अशा परिस्थितीत आम्ही गाण्याच्या निर्मितीशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत.

सर्वांना माहित आहे की, ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर’ या गाण्याला अरेबियन लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अशा परिस्थितीत, गाण्याचे काही भाग वाळूत चित्रित केले गेले, जे अजिबात सोपे नव्हते. जेव्हा नोरा वाळूवर नाचताना एक पाऊल टाकायची, तेव्हा कधी वाळू तिच्या डोळ्यात तर कधी तोंडात जात असे. ज्यामुळे तिला खूप त्रास झाला होता. (nora fatehi dilbar completes 4 years of release song making video viral)

याशिवाय नोराने हे गाणे रिकाम्या पोटी शूट केले आहे. कारण नोराला बेली डान्स करायचा होता आणि त्यासाठी ती परफेक्ट दिसणं आवश्यक होतं. या गाण्याच्या मेकिंगदरम्यान नोरा खूप नर्व्हस होती. मात्र, जेव्हा हे गाणे तयार झाले, तेव्हा अभिनेत्रीच्या डान्स मूव्हने प्रेक्षकांची झोप उडवली. हे गाणं इतकं हिट झालं, की आजही अनेक लग्न आणि पार्ट्यांमध्ये हे गाणं ऐकायला मिळतं.

साल १९९३ मध्ये आलेल्या ‘सिर्फ तुम’ या चित्रपटात ‘दिलबर’ गाण्याचे मूळ व्हर्जन सुष्मिता सेनवर (Sushmita Sen) चित्रित करण्यात आले होते. त्याच वेळी, डान्सिंग क्वीन नोराला या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनवर परफॉर्म करण्याची संधी मिळाली. हे गाणे रिलीझ झाले, त्या दिवशीच गाण्याला २० दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते आणि बिल बोर्ड म्युझिक चार्टवर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणारे पहिले भारतीय गाणे होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा