गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये झळकणारी तरुण डांसर आणि अभिनेत्री नोरा फतेही सगळ्यांचीच आवडती सेलिब्रिटी होऊ लागली आहे. फार कमी दिवसात तिने स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. कॅनडाची नागरिक असलेली नोरा बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी स्वतःच घर सोडून भारतात पळून आली होती. त्यानंतर संघर्ष करत तिने चित्रपटात अभिनय आणि डांस करायला सुरुवात केली. हळू हळू नोरा बॉलिवूडमध्ये निर्माती म्हणूनही समोर येत आहे. असं सगळं असलं तरी डांस हा नोराचा जीव की प्राण आहे. आणि त्यामुळेच ती तिच्या डांसचे व्हिडिओज सोशल मीडियावर टाकत असते. असाच एक नवा डांस व्हिडीओ तिने शेअर केला आहे चला नेमका काय व्हिडीओ आहे पाहुयात.
नोरा फतेही तिच्या उत्कृष्ट डांस मुव्ह्जसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचे डांसचे व्हिडिओ नियमित व्हायरल होत आहेत. नोरा फतेहीने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे जो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोरियोग्राफर रजित देव सह नोरा ‘बॉडी सॉंग’ वर उत्कृष्ट डांस करत आहे.
नोरा फतेहीचा हा डांस व्हिडिओ पाहून, चाहते नोराचं चहू बाजूंनी कौतुक करत आहेत. नोरा फतेही या व्हिडिओमध्ये, शॉर्ट्स, स्लिव्हलेस टॉप आणि कॅप घातलेल्या कुल लुकमध्ये नाचत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३९ लाखांहून अधिक व्ह्यूज आल्या आहेत.
नोरा नुकतीच करीना कपूरच्या व्हॉट वुमन वॉन्ट या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये नोरा फतेहीने अनेक खुलासे केले. नोरा फतेहीने शोमध्ये बॉलीवूडच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली की एकदा तिला कास्टिंग डिरेक्टरने घरी बोलावलं आणि खूप बोल लावले होते. त्याच्या वर्तनामुळे ती इतकी दुःखी झाली होती की तिने भारत सोडण्याचा निर्णय घेतला होता.