‘नोरा फतेही’ ही आपल्या डान्स स्टाईलला घेऊन सोशल मीडियावर खूपच ट्रेण्ड होत असते. तिच्या गाण्यांवर लाखो हिट्सचा वर्षाव होताना दिसतो. अशाच तिच्या एका गाण्याला सध्या लाखो व्हिव्ज मिळत आहेत. ‘ मराजावा ‘ एक तो कम जिंदगानी, उससे भी कम है जवानी ‘ या गाण्यावर नोराने डान्स करून पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
ब्लु कलरचा ट्रॅकसूट घालून या व्हिडीओमध्ये डान्सर तेजस आणि इशप्रीत यांच्यासोबतही तीने हा व्हिडीओ केला आहे. नोरा या डान्सर्ससोबत या गाण्यात खूप एन्जॉय करताना दिसत आहे. नेहमीप्रमाणेच या गाण्याला सुद्धा तिचे अगदी परफेक्ट मुव्हस दिसत आहेत. तिचा हा डान्स पाहून तिचे चाहते या व्हिडीओवर कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत.
मरजावा या चित्रपटात चित्रित केलेल्या गाण्यांसाठी नोराने खूप मेहनत घेतली होती. तिने पावसात भिजताना खूप अवघड शॉट्स दिले होते. असे म्हणतात की ,या गाण्यात हाई हिल्स घालून डान्स केल्यामुळे नोराच्या पायाला सूज देखील आली होती. याव्यतिरिक्त सेटवर खूप गर्मी असल्यामुळे नोराचा मेकअप सारखा खराब होता होता. या सगळ्या अडचणी असतानाही नोराने अतिशय प्रोफेशनल होत या गाण्यावर अतिशय सुंदर डान्स केला. प्रेक्षकांनी देखील तीचे खूप कौतुक केले. खरंतर हे गाणं मुळत: ‘ सागर ‘ ह्या चित्रपटातील आहे, जे ‘ सपना मुखर्जी ‘ यांनी गायले आहे. मरजावा चित्रपटात ते रिमिक्स करून करून नोरावर चित्रित केले आहे.
डान्स सोबतच नोराच्या ड्रेसकडेही प्रेक्षक खूप आकर्षित झाले. नोराने पांढऱ्या मोत्याच्या ब्लाऊजवर आपल्या नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. जे खूप कमी वेळात वायरल झाले. हे तर नाही माहीत की, नोराने कोणत्या गाण्यासाठी हा लूक केला होता? की फक्त फोटोशूट केले आहे ? परंतु तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाच्या कमेंटचा वर्षाव केला आहे.