बॉलिवूडची सुपर डान्सर नोरा फतेही (nora fatehi) आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. आपल्या दमदार डान्समुळे तिने सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे . तिच्या पोस्टची तिचे चाहते नेहमीच वाट पाहत असतात. यामध्ये ती कधी आपल्या डान्सचे तर कधी आपले बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते. मात्र नुकतेच तिचे सोशल मिडिया अकांउट हॅक करण्यात आले होते. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
सोशल मीडियावर आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी सतत चर्चेत राहणारी सुपर डान्सर नोरा फतेहीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. कारण नोराचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटच बंद झाले होते. नोराच्या पोस्टची, बोल्ड फोटोंची नेहमी वाट पाहणाऱ्या तिच्या चाहत्यांना मात्र या प्रकाराने काळजीत टाकले होते. अनेकांनी तर नोराने आपले इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करुन सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असा अंदाजही लावला होता. परंतु काही काळाने नोराचे अकांउट इंस्टाग्रामवर दिसू लागल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. याबद्दल नोरानेच स्टोरी शेअर करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली.

हा सगळा प्रकार शुक्रवारी ४ जानेवारीला घडला होता. अचानकच नोराचे इंस्टाग्राम अकाउंट दिसेनासे झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. अनेकांनी याला तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज लावला होता, तर काही जणांनी नोराने स्वताःच आपले अकाउंट डिलीट करत सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतल्याचे ही सांगितले होते. मात्र काही काळाने तिचे अकाउंट पून्हा सुरु करण्यात आले ज्याची नोरानेच माहिती दिली होती. आपले अकाउंट सुरु झाल्यानंतर तिने एक स्टोरी ठेवली ज्यामध्ये “माफ करा मित्रांनो, माझे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सकाळपासून हा प्रयत्न चालू होता मात्र इंस्टाग्रामच्या टीमने माझी मदत करत हा बिघाड नीट केला” अशी माहिती देण्यात आली होती. सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या नोराने सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे इंस्टग्रामवर तब्बल ३७.६ मिलीयन इतके फॉलोवर्स आहेत. त्यामुळेच नोराचे अकाउंट दिसत नसल्याने चाहते काळजीत पडले होते.
हेही वाचा :