नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) ‘सरके चुनार’ या गाण्यावरून सुरू असलेला वाद अजूनही कायम आहे. आता हा मुद्दा राष्ट्रीय संसद असलेल्या लोकसभेत उपस्थित करण्यात आला आहे. केंद्र सरकारने या गाण्यावर बंदी घातली असून, त्याची हिंदी व्हर्जन यूट्यूबवरून काढून टाकले आहे. आता नोरा फतेहीने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
नोराने या संपूर्ण वादापासून स्वतःला स्पष्टपणे दूर ठेवले आहे आणि सांगितले आहे की, तिने हे गाणे तीन वर्षांपूर्वीच कन्नडमध्ये चित्रित केले होते. इतकेच नाही तर, तिने ‘केडी’ चित्रपटाच्या निर्मात्यांवर आरोप केला आहे की, गाण्याचे हिंदीत भाषांतर करण्यापूर्वी किंवा ते हिंदीत प्रदर्शित करण्यापूर्वी तिच्याशी सल्लामसलत केली गेली नाही. तिला यापैकी कशाचीही कल्पना नव्हती. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये नोरा काय म्हणाली आहे, ते जाणून घेऊया.
नोरा फतेहीने ‘सरके चुनर’ या गाण्यावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना इन्स्टाग्रामवर एक मोठा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने गाण्याभोवतीच्या वादावर सविस्तरपणे भाष्य केले आहे. तिने हेही स्पष्ट केले की, हिंदी आवृत्तीशी तिचा काहीही संबंध नव्हता. आपल्या व्हिडिओमध्ये नोरा सुरुवातीला म्हणाली, “सर्वप्रथम, मी हे गाणे तीन वर्षांपूर्वी कन्नडमध्ये चित्रित केले होते. मी ते तेव्हा चित्रित केले कारण त्यात संजय दत्त होता. जो काही वाद आहे तो गाण्याच्या हिंदी व्हर्जनबद्दल आहे. निर्मात्यांनी त्यासाठी माझी परवानगी घेतली नाही, आणि मी या गीतांवर नृत्यही चित्रित केले नाही.”
नोराने व्हिडिओमध्ये पुढे सांगितले की, निर्मात्यांनी स्वतःचा प्रचार करण्यासाठी एआय (AI) वापरून माझा आणि संजय दत्तचा एक फोटो तयार केला. माझा एआयला तीव्र विरोध आहे. जेव्हा मी ते पाहिले, तेव्हा मला खूप राग आला आणि मी माझी नाराजी व्यक्त केली.
हिंदी व्हर्जनबद्दल नोरा फतेही म्हणाली की, तिसरे म्हणजे, जेव्हा निर्मात्यांनी पहिल्यांदा हिंदी व्हर्जनव्हिडिओच्या शेवटी, अभिनेत्रीने गाण्याविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आणि म्हटले, “चौथे म्हणजे, मी भविष्यात अधिक दक्ष राहीन. आंदोलन करून सर्व प्लॅटफॉर्मवरून गाणे काढून टाकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.”
अशा प्रकारची सामग्री तयार केल्याबद्दल चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना जबाबदार धरले पाहिजे. फक्त आमची नावे वापरू नका, कारण त्यावर आमचे कोणतेही हक्क नाहीत. त्यांना जबाबदार धरा. मी भविष्यात आणखी दक्ष आणि कठोर राहीन. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
नोराने व्हिडिओमध्ये तिच्या वैयक्तिक दुःखाचाही उल्लेख केला. अभिनेत्रीने स्पष्ट केले की ती तिच्या जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे दुःखी आहे, ज्यांच्या जाण्याने तिला खूप दुःख झाले आहे. प्रदर्शित केली, तेव्हा मी दिग्दर्शकाला सांगितले होते की मी त्याचा कधीही प्रचार करणार नाही, कारण त्यामुळे माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. मी त्याला ताकीदही दिली होती.
ते बनवण्यापूर्वी त्यांनी माझी परवानगी का घेतली नाही, असे विचारून मी माझी नाराजी व्यक्त केली. अभिनेत्रीने असेही म्हटले की, मी घराणेशाहीची मुलगी नाही आणि मी माझे स्थान स्वतःच्या हिमतीवर मिळवले आहे, त्यामुळे दक्षिणेकडील लोक माझे ऐकत नाहीत. मात्र, मी आभारी आहे की बॉलिवूडमध्ये लोक माझे ऐकतात आणि माझा सल्ला मानतात. पण दक्षिणेत त्याला काही महत्त्व नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
फोर्स सिनेमाच्या तिसऱ्या पार्टसाठी हर्षवर्धन राणे वाढवतोय वजन? जाणून घ्या त्याचे टार्गेट










