Monday, June 17, 2024

चार वर्षांच्या तैमूरशी करायचं आहे नोराला लग्न, अशाप्रकारे आई करिनासमोर ठेवला लग्नाचा प्रस्ताव

करीना कपूरचा शो व्हॉट वुमन वॉन्ट हा सध्या फिल्मी मिरची या युट्युब चॅनल वरून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. या शोमध्ये करीना महिलांच्या विषयांवर एक सेलिब्रिटी पाहुणे बोलवून त्यांच्यासोबत चर्चा करते. आतापर्यंत करीनाच्या या शोमध्ये आतापर्यंत कियारा अडवाणी, अनन्या पांडे, अनिल कपूर, अनुराग कश्यप, वरूण धवन,
बरखा दत्त इत्यादी मंडळी येऊन गेली आहेत. नुकताच करीनाच्या शोचा नवा भाग प्रसिद्ध झाला त्यात पाहुणी म्हणून नोरा फतेही आली होती.

या मुलाखतीत बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने करीना कपूर खानचा मुलगा तैमूर अली खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. करीना कपूर खानच्या चॅट शो व्हॉट वूमन वॉन्टवर नोरा म्हणाली की तैमूर अली खान मोठा होईपर्यंत ती थांबेल कारण नोरा तैमूर अली खानशी लग्न करू इच्छित आहे. नोराचा प्रस्ताव ऐकून करिना आश्चर्यचकित झाली आणि नोराला म्हणाली, ‘तैमूर अली अवघ्या ४ वर्षांचा आहे. मला वाटते की अद्याप बराच काळ आहे.’ यावर नोरा फतेही म्हणाले की काही हरकत नाही, ‘मी वाट पाहीन.’

चॅट शो दरम्यान करीनाने नोराला सांगितले की, ती आणि तिचा नवरा सैफ अली खान तिच्या डान्स मूव्हजचे खूप मोठे चाहते आहेत. नोराने याबद्दल तिचे आभार मानले आणि म्हणाली, ‘मला आशा आहे की तैमूर लवकरच मोठा होईल. त्यानंतर मग माझ्या आणि त्याच्या लग्नाचा विचार आपण करू शकतो.’

सैफ अली खान आणि करिना कपूर खानचा मुलगा तैमूर जन्मापासूनच एक सेलिब्रिटी झाला आहे. तैमूर त्याचे फोटो आणि व्हिडीओजसह सोशल मीडियावरही खूप ट्रेंड होत असतात.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर नोरा अखेर रेमो डिसूझाच्या ‘स्ट्रीट डान्सर ३’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसली होती जो चित्रपट मागच्या वर्षीमध्ये जानेवारीत रिलीज झाला होता. अलीकडेच गुरु रंधावाच्या ‘नाच मेरी रानी’ या गाण्यावर नोरादेखील थिरकली होती. हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच गाजले होते आणि युट्यूबवर आतापर्यंत या गाण्याला ३०० दशलक्ष वेळा पाहिलं गेलं आहे.

याशिवाय तिचं आणखीन एक गाणं ‘साकी साकी’ सुद्धा खूप प्रसिद्ध झालं आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये तिचा डांस निव्वळ अप्रतिम आहे असंच म्हणावं लागेल.

हे देखील वाचा