Friday, July 5, 2024

हेमा मालिनी नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावले होते अभिनेते संजीव कुमार यांना वेड

संजीव कुमार (Sanjiv Kumar) हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी सिने जगतातील एक काळ चांगलाच गाजवला होता. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटांची आणि अभिनयाची आजही चर्चा होताना दिसत असते. दिलीप कुमार आपल्या अभिनयाइतकेच त्यांच्या प्रेमप्रकरणांमुळेही विशेष गाजले. संजिव कुमार हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले होते. हे सर्वांनाच माहित आहे. पण संजीव कुमार आणि अभिनेत्री नुतन यांची प्रेमकथाच सिने जगतात सर्वाधिक गाजली होती. अशात आज रविवारी (9 जुलै)ला संजीव कुमार यांची जयंती आहे. चला, तर या निमित्त जाणून घेऊया अभिनेत्याच्या आयुष्यातील रंजक किस्सा…

संजीव कुमार आणि नूतन यांनी 1968 मध्ये आलेल्या ‘देवी’ चित्रपटात एकत्र काम केले होते. इथूनच संजीव कुमार आणि नूतन एकमेकांच्या जवळ आल्याचे सांगितले जाते. याच चित्रपटामुळे दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली होती. नूतन आधीच विवाहित होती आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती तिचा पती लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल यांच्याशी माहिती घेत नव्हती. नूतन आणि रजनीश बहल यांचे  1959मध्ये लग्न झाले.

रजनीश यांना नूतन आणि संजीव कुमार यांच्यातील संबंधाचा सुगावा लागला होता. यानंतर नूतनने आपले लग्न वाचवण्यासाठी संजीव कुमार यांच्याशी दुरावा निर्माण केला. मात्र, नूतननंतर संजीव कुमार यांचे मन अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर आले. असे म्हटले जाते की संजीव कुमार यांनी हेमा मालिनींना दोनदा प्रपोज केले पण त्यांनी नकार दिला. यामुळे संजीव कुमार इतके दुखावले होते की त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचेही संजीव कुमारवर प्रेम होते. अशा परिस्थितीत जेव्हा संजीवने लग्न केले नाही तेव्हा सुलक्षणा पंडितही अविवाहित राहिल्या होत्या. (not hema malini sanjeev kumar liked this actress)

अधिक वाचा- 
‘बदन पे सितारे लपेटे हुए…’, उर्फीचा लेटेस्ट लूक पाहिलात का?
“नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”, अभिनेते संजय मोने यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हे देखील वाचा