Monday, July 1, 2024

केवळ ‘जय भीम’च नाही, तर ‘हे’ चित्रपट देखील आहेत सत्य घटनांवर आधारित, टाका एक नजर

‘जय भीम’ चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाने आणखी एक कारनामा केला आहे. ‘जय भीम’ या चित्रपटाने हॉलिवूडच्या सुप्रसिद्ध चित्रपट ‘द शॉशँक रिडेम्प्शन’ला मागे टाकले आहे आणि आयएमडीबीवर सर्वोच्च रेटिंग मिळवली आहे. या चित्रपटाला १० पैकी ९.६ रेटिंग मिळाली आहे. हा चित्रपट खूप लोकप्रिय होत आहे. प्रकाश राज यांच्या चापट मारणाऱ्या सीनमुळे वाद निर्माण झाला होता, त्यामुळे ते सोशल मीडियावर ट्रोल देखील झाले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन टीजे गानवेल यांनी केले आहे.

हा चित्रपट मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती चंद्रू यांच्या वकिली कारकिर्दीच्या प्रसिद्ध खटल्यावर आधारित आहे. ते वकील असताना कुर्वा जमातीच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढले. मात्र, पीडित आदिवासी चित्रपटात इरुलर जातीचा दाखवण्यात आला आहे. आदिवासींसोबत होणारा भेदभाव आणि शोषण या चित्रपटात ठळकपणे मांडण्यात आले आहे. या चित्रपटात इरुलर समाजातील राजकन्नू आणि सेंगानी या जोडप्यावर जातीय अत्याचार आणि संघर्षाचे चित्रण केले आहे. जर तुम्हाला हा चित्रपट आवडला असेल, तर आज आपण अशाच काही सत्य घटनेवर आधारित चित्रपटाबद्दल जाणून घेऊया.

थेरान अधिगारम ओन्ड्रू
‘जय भीम’ आवडणारे प्रेक्षक ‘थेरान अधिगारम ओन्ड्रू’ चित्रपट पाहू शकतात. तो देखील सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट त्या घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये दोन सदस्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते आणि उत्तर प्रदेशातील तमिळनाडू पोलिसांनी काही घातक बावरिया गुन्हेगार आदिवासींना अटक केली होती. एआईएडीएमके गुम्मीदिपोंडीचे आमदार सुदर्शनम यांच्या हत्येची प्रतिक्रिया म्हणून आणि तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात अराजकता निर्माण करणाऱ्या सशस्त्र दरोडेखोरांची प्रतिक्रिया म्हणून २००५ मध्ये ऑपरेशन बावरिया सुरू करण्यात आले.

असुरन
‘असुरन’ चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट वेक्काई या कादंबरीवर आधारित आहे. खरी घटना किझवेनमनी येथे घडली होती. हा चित्रपट एका गरीब जातीतील शेतकऱ्याच्या मुलाभोवती फिरतो, जो एका श्रीमंत जमीनदाराची हत्या करतो. या चित्रपटात सुपरस्टार धनुष मुख्य भूमिकेत होता.

राजन्ना
‘राजन्ना’ चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट देखील एका सत्य घटनेवर आधारित असून, त्याचे लेखन आणि दिग्दर्शन व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी केले आहे. हा चित्रपट रझाकार चळवळ आणि स्वातंत्र्यसैनिक सुदाला हनमंथू यांच्यापासून प्रेरित आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुर्याचा दमदार ड्रामा चित्रपट आहे ‘जय भीम’, पाहण्यापूर्वी वाचा रिव्ह्यू

-‘जय भीम’ चित्रपटातील ‘त्या’ सीनवर प्रकाश राज यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘लोकांना आदिवासींचे हाल दिसले नाहीत’

-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…

हे देखील वाचा