Monday, July 1, 2024

काय सांगता! श्रीदेवी नव्हे, तर जयाप्रदा होत्या ‘नगिना’साठी पहिली पसंत; पण ‘या’मुळे अभिनेत्रीने दिला होता नकार

‘मैं तेरी दुश्मन… दुश्मन तू मेरा, मैं नागिन तू सपेरा…’ हे गाणे ऐकून तुम्हाला श्रीदेवींची (Sridevi) पांढऱ्या ड्रेसमधील नागीणसारखी नाचणारी सुंदर प्रतिमा नक्कीच आठवली असेल. १९७६ साली प्रदर्शित झालेला हा ‘नगीना’ हा तो चित्रपट आहे, जो तुम्ही आयुष्यात एकदा तरी पाहिलाच असेल. श्रीदेवींचा ‘नगीना’ हा चित्रपट त्यांच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा ठरला. पण तुम्हाला माहित आहे का की, श्रीदेवींची ही भूमिका सर्वप्रथम जयाप्रदा (Jaya Prada) यांना चित्रपटासाठी ऑफर करण्यात आली होती.

‘नगीना’ चित्रपटात ऋषी कपूर (Rishi Kapoor), श्रीदेवी आणि अमरीश पुरीसारखे (Amrish Puri) दिग्गज कलाकार दिसले होते. या चित्रपटातील श्रीदेवींच्या नगीना अवताराने सर्वांची मने जिंकली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘नागिन’साठी निर्मात्यांची पहिली पसंती श्रीदेवी नसून जयाप्रदा होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शक हरमेश मल्होत्रा ​​यांनी सर्वप्रथम जयाप्रदा यांना चित्रपटाची ऑफर दिली होती. (not sridevi jayaprada was first offered the role of nagina but she refused)

रिपोर्टनुसार, जया यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. याचे खरे कारण म्हणजे साप. खरे तर अभिनेत्रीला सापांची खूप भीती वाटते, त्यामुळे त्यांनी हा चित्रपट करण्यासही नकार दिला होता. त्यानंतर ही भूमिका श्रीदेवी यांना ऑफर झाली आणि त्यांनीही ती मनापासून साकारली. ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांचा ‘नगीना’ हा चित्रपट सुपरहिट ठरला.

जयाप्रदा – श्रीदेवी 2 तास खोलीत बंद राहूनही एकमेकांशी बोलल्या नाहीत
त्याकाळात श्रीदेवीची स्पर्धा सर्वात जास्त जयप्रदा यांच्याशी असायची. दोघींनाही एकमेकांना पाहायला तर लांबच परंतु बोलयलाही आवडत नव्हते. एकदा दोघींमध्ये पॅचअप व्हावे या उद्देशाने राजेश खन्ना आणि जितेंद्र यांनी त्यांना 2 तास खोलीत बंद ठेवले. जेव्हा दार उघडले तेव्हा असे समोर आले की दोघी वेगवेगळ्या कोपऱ्यात बसल्या आहेत. एकाच खोलीत राहूनही दोघींनी एकमेकींकडे पाहिलेही नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा