साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता भारतीय चित्रपटसृष्टीतील टॉप स्टार बनला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला एका पान मसाला कंपनीकडून जाहिरातीसाठी मोठी रक्कम मिळाली होती, परंतु अभिनेत्याने न डगमगता ती नाकारली. यामागचे कारण म्हणजे, अल्लू अर्जुन वैयक्तिकरित्या तंबाखूचे सेवन करत नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी ही जाहिरात पाहून त्याचे सेवन करायला सुरुवात करावी, असे त्याला वाटत नाही.
‘या’ सवयींचे समर्थन करतो अल्लू अर्जुन
अल्लू अर्जुन झाडे लावण्यासारख्या सवयींचे समर्थन करत आहे, ज्याचा व्यक्ती आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो. अल्लू अर्जुनच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की, चित्रपटांमध्ये धूम्रपान करणे अभिनेत्याच्या हातात नसते. मात्र शक्य असेल तेव्हा त्याने या उपभोगाच्या कल्पनेच्या विरोधात असल्याचा संदेश दिला. (now pushpa starrer allu arjun pan masala company endorsement offer)
चित्रपटसृष्टीला नवे वळण
भारतीय चित्रपट उद्योगासाठी हे नवीन आहे. एकीकडे तेलुगू कलाकारांसह टॉपचे नायक भरमसाठ रक्कम मोजून उत्पादनाची जाहिरात करायला मागेपुढे पाहत नाहीत. दुसरीकडे, अल्लू अर्जुनसाठी, हे केवळ पैशाबद्दल नाही, तर त्याच्या चाहत्यांच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी देखील आहे.
तंबाखूच्या जाहिरातींवरून ट्रोल झाले बॉलिवूड अभिनेते
अलीकडेच अजय देवगण (Ajay Devgan) आणि शाहरुख खाननंतर (Shahrukh Khan) बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) एका पान मसाला जाहिरातीत सामील झाला आहे. ही बातमी समोर आल्यापासून अक्षय कुमारला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे. अक्षयने आपल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते की, गुटखा कंपन्या त्याला करोडोची ऑफर देतात, पण तो त्या नाकारतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा