Friday, March 14, 2025
Home साऊथ सिनेमा ज्युनिअर एनटीआरवर कोसळला दुखाःचा डोंगर, कुटूंबातील व्यक्तीने केली आत्महत्या

ज्युनिअर एनटीआरवर कोसळला दुखाःचा डोंगर, कुटूंबातील व्यक्तीने केली आत्महत्या

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि अभिनेते एनटी रामाराव (NT Ramarao) यांची कन्या कंठमनेनी उमा माहेश्वरी हिचे सोमवारी (१ ऑगस्ट) निधन झाले. तेलगू देशम पार्टी (टीडीपी) च्या संस्थापकाच्या १२ मुलांपैकी सर्वात लहान उमाने आजारपणानंतर हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. ५२ वर्षीय उमाने ज्युबली हिल्स येथील राहत्या घरी गळफास लावून घेतला. ज्युबली हिल्स पोलिसांना दुपारी २.३५ च्या सुमारास आत्महत्येची माहिती मिळाली. उमा यांची मुलगी दीक्षिता हिला तिचा मृतदेह बेडरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

उमा माहेश्वरीच्या निधनाने नंदामुरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चार बहिणींमध्ये ती सर्वात लहान होती. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दग्गुबती पुरंदेश्वरी आणि टीडीपी अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची पत्नी नारा भुवनेश्वरी या तिच्या बहीणी आहेत.

कोण होते एनटी रामाराव?
एनटी रामाराव हे तेलगू भाषेतील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध होते. ते अभिनेतापासून राजकारणी झाले. १९८२ मध्ये त्यांनी तेलुगू स्वाभिमानचा नारा देत टीडीपीची स्थापना केली आणि नऊ महिन्यांत पक्षाला सत्तेवर आणून एक प्रकारचा विक्रम केला. त्यांनी तत्कालीन अविभाजित आंध्र प्रदेशातील काँग्रेसची सत्ता संपवली.

१९९६ मध्ये त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांना बंडखोरी करून सत्तेवरून हटवल्यानंतर, काही महिन्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

हेही वाचा

हे देखील वाचा