राजीव गांधी हत्येतील दोषीसोबत नाचताना दिसले ‘कटप्पा’ अभिनेता सत्यराज, व्हिडिओ व्हायरल

‘बाहुबली’च्या प्रत्येक पात्राने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.’बाहुबली’ नंतरच उत्तर भारतात दक्षिणेच्या चित्रपटांना वेग आला. या चित्रपटाची क्रेझ अशी होती की, त्यातील कलाकार पडद्यावर साकारलेल्या पात्रांवरूनच ओळखले जाऊ लागले.दरम्यान, ‘बाहुबली’मध्ये ‘कटप्पा’ची भूमिका साकारणारे अभिनेता सत्यराजचा (Sathyaraj) एक व्हिडिओ चर्चेत आहे. सत्यराज यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ते एका कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सत्यराजसोबत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा दोषीही मंचावर उपस्थित आहे. अभिनेता त्याच्यासोबत डान्स करताना दिसत आहेत.

कार्यक्रमात नेत्यांनाही करण्यात आले होते आमंत्रित
राजीव गांधी यांच्या हत्येतील एक दोषी एजी पेरारिवलन याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. पेरारिवलनच्या आई-वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा पार पाडला. यादरम्यान सत्यराज स्टेजवर पेरारिवलनसोबत डान्स करताना दिसत दिसले. व्हिडिओमध्ये सत्यराज व्यतिरिक्त मंचावरील इतर व्यक्तीही दिसत आहेत. या कार्यक्रमाला अनेक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (sathyaraj dancing with rajiv gandhi assassination convict)

अटकेपासून ते  सुटकेपर्यंत
राजीव गांधी हत्येचा दोषी पेरारिवलन ३१ वर्षे तुरुंगात होता. तुरुंगातील लोकांप्रती त्याची चांगली वागणूक पाहून, सुप्रीम कोर्टाने ९ मार्च २०२२ रोजी त्याची निर्दोष मुक्तता केली. ११ जून १९९१ रोजी पेरारिवलनला त्याच्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो १९ वर्षांचा होता. न्यायालयानेही त्याला या प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

Latest Post