Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड हाय गर्मी! ओवरसाईज्ड ओपन शर्टमध्ये नुसरत भरुचाचे बोल्ड फोटोशूट, दिसतेय एकदम कडक

हाय गर्मी! ओवरसाईज्ड ओपन शर्टमध्ये नुसरत भरुचाचे बोल्ड फोटोशूट, दिसतेय एकदम कडक

नुसरत भरुचा ही हिंदी सिनेसृष्टीतील सध्याच्या घडीला आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नुसरातने मोठ्या संघर्षाने आणि मेहनतीने यश संपादन केले आहे. आज नुसरतला कोणत्याही ओळखीची गरज नाही. बोल्ड अँड ब्युटीफुल असणारी नुसरत सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती सतत तिचे फोटो अपडेट करताना दिसते. टीव्हीपासून चित्रपटांमध्ये जाणाऱ्या नुसरतने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर तिचे नाव कोरले आहे.

नुसरातचे सोशल मीडिया अकाउंट उघडून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, ती किती स्टायलिश आणि बोल्ड आहे. नवनवीन स्टाईल कॅरी करणे तिला उत्तम पद्धतीने जमते. नुकतेच नुसरतने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये तिने तपकिरी रंगाचा शर्ट घातला असून, यात ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. (nushrratt bharuccha brown shirt photos)

नुसरत या ओवरसाइज्ड ओपन शर्टमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. तिच्या या शर्टमधून तिचा व्हाइट ब्रालेट टॉप स्पष्ट दिसत आहे. मोकळे केस, न्यूड मेकअपमध्ये ती या लूकमुळे खूप मादक दिसत आहे. तिचे हे फोटो खूप व्हायरल होत असून, फॅन्स आणि कलाकार यावर एकापेक्षा एक कमेंट्स करत आहेत.

नुसरातने तिच्या करियरची सुरुवात टीव्हीवरील ‘किटी पार्टी’ या शोपासून केली. बॉलिवूडमध्ये तिने ‘जय संतोषी माँ’ सिनेमातून पदार्पण केले. मात्र हा सिनेमा फ्लॉप झाला. त्यानंर्र ती २००९ साली ‘कल किसने देखा’ सिनेमात झळकली. २०११ साली आलेल्या ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. २०१५ साली ‘प्यार का पंचनामा२’ मध्ये ती पुन्हा दिसली. मात्र तिला खरी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली ती २०१८ साली आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या सिनेमानंतर. आज नुसरत खूप यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

 

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पुरुष कलाकारांना जास्त फी मिळण्यावर बोलल्या नीना गुप्ता; म्हणाल्या, ‘पुरुषांच्या या जगात स्त्रियांना…’

-‘बिग बॉस’च्या घराबाहेर राखी सावंतला चावला कुत्रा; म्हणाली, ‘मी पण त्याला चावणार’

-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात

 

हे देखील वाचा