Wednesday, June 26, 2024

‘क्या यही प्यार है’चा टीझर रिलीझ, नुसरत भरुचा अन् सनी कौशलच्या रोमान्सने तोडल्या सगळ्या मर्यादा

 अभिनेत्री नुसरत भरुचाने ने ‘क्या यही प्यार है’ चा टीझर रिलीझ केला आहे. त्याचबरोबर हे गाणे उद्या येणार असल्याची माहितीही तिने दिली आहे. या पोस्टमध्ये तिने भूषण कुमार, सनी कौशल आणि अरमान मलिक यांनाही टॅग केले आहे. १८ सेकंदांच्या या टीझरमध्ये ती बुलेटवर बसलेल्या सनी कौशलसोबत रोमान्स करताना दिसत आहे. टीझरच्या शेवटी ती सनी कौशलला किस करताना दिसत आहे. सध्या या टीझरची सगळीकडे चर्चा पाहायला मिळत आहे.

नुसरत भरुचा एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने नुसरतने हिंदी चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. आपल्या चित्रपटांइतकीच ती तिच्या सोशल पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, ज्याबद्दल चाहतेही उत्सुक असतात. नुसरत भरुचाने याआधी कार्तिक आर्यनसोबत ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर तिने त्याच्यासोबत इतरही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तिने आगामी ‘क्या यही प्यार है’ गाण्याचा टीझर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

नुसरत भरुचाचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. याला २ तासात ७१ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावर अनेकांनी अशा कमेंट केल्या आहेत. इंस्टाग्रामवर नुसरत भरुचाचे खूप चाहते आहेत. ती अनेकदा तिच्या चाहत्यांशीही संवाद साधत असते. या गाण्याच्या टिजरवर प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी खूप छान, अप्रतिम, वाट पाहत अशा कमेंन्ट केल्या आहेत.

या गाण्यामधील अभिनेता सनी कौशल हा विकी कौशलचा भाऊ आहे. त्याच्या अभिनयाचीही नेहमीच चर्चा पाहायला मिळत असते. सध्या ‘क्या यही प्यार है’ गाण्यातील त्याच्या आणि नुसरतच्या केमिस्ट्रीची चर्चा होत आहे. सध्या या व्हायरल टीजरवर प्रेक्षक विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा