‘अबोली’ मालिकेत नाव ट्विस्ट, हिंदी मालिकेतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची होणार दमदार एन्ट्री

स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होणारी ‘अबोली’ (Aboli) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झाले आहे. यामुळेच प्रेक्षक ही मालिका आवडीने पाहतात. ही मालिका नवीन असली तरी सतत चर्चेत राहिली आहे. अल्पावधीतच घराघरात पोहोचलेल्या या मालिकेत प्रेक्षकांच्या मनावर अगदी भुरळ घातली आहे. आता या मालिकेबद्दल अशी माहिती समोर आली आहे की, या मालिकेत एका नवा ट्विस्ट येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया की, हा नवा ट्विस्ट आहे तरी काय!

अलीकडेच या मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले आहेत. आता ही मालिका नवे वळण घेण्याच्या जोमात आहे. आता या मालिकेबाबत अशी माहिती समोर आली आहे की, यात हिंदी आणि मराठी कलाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याची दमदार एन्ट्री होणार आहे. त्याचमुळे आता या मालिकेत काय नवा ट्विस्ट येईल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठी विश्वात हिंदी कल कलाकाराची एन्ट्री झाल्यानंतर मालिका काय नवे वळण घेईल हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

आता या मालिकेत उदय टिकेकर (Uday Tikekar) यांची एन्ट्री होणार आहे. ते या मालिकेत डीसीपी किरण कुलकर्णी यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. उदय टिकेकर यांचे मालिकेत आगमन झाल्यानंतर मालिका काय नवे वळण घेईल यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rishi Lakshmi (@_bhagyalakshmi_official)

या मालिकेत मुख्य भूमिका प्रसिद्ध अभिनेता सचित पाटील (Sachit Patil) साकारत आहे. सचित या मालिकेत एका पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. ज्याला प्रेक्षकांची प्रचंड प्रसिद्धी मिळत आहेत. सचित पाटीलच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ‘क्षणभर विश्रांती’, ‘वन वे तिकीट’, ‘क्लासमेट्स’, ‘फ्रेंड्स’, ‘पैसा पैसा’, ‘असा मी अशी ती’, ‘साडे माडे तीन’, ‘अर्जुन’, ‘झेंडा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

Latest Post