अभिनेत्री आणि सांसद नुसरत जहां आज त्यांचा ३० वाढदिवस साजरा करत आहे. ८ जानेवारी १९९० साली कोलकातामध्ये त्यांचा जन्म झाला. नुसरत नेहमी त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांचे सौंदर्य आणि त्यांचा अंदाज नेहमीच लोकांना आकर्षित करत असतो. नुसरत आज ज्या ठिकाणी आहे, तिथे पोहचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे.
नुसरत ह्या भारतातील सर्वात सुंदर राजनेता म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी राजकारणात येण्याआधी बंगाली चित्रपटातून अभिनय देखील केला. मात्र जेव्हा त्या लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झाल्या तेव्हा त्या सर्वात जास्त चर्चेत आल्या. २०१९ साली त्यांनी कोलकातामधून TMC तर्फे उभे राहत विजय मिळवला आणि संपूर्ण देशात त्या ओळखल्या जाऊ लागल्या.
विजयी झाल्यानंतर जेव्हा त्या पहिल्यांदा संसदेत पोहचल्या तेव्हा वेस्टर्न ड्रेसमुळे त्यांच्यावर खूप टीका केली गेली. त्यानंतर जेव्हा त्यांनी साडी नेसून त्यांची लोकसभेतील पहिली स्पीच दिली तेव्हा सर्व लोकांची तोंडे त्यांनी बंद केली होती.
नुसरत यांचे खाजगी आयुष्यदेखील खूप विवादांनी भरलेले आहे. नुसरत यांनी उद्योगपती निखिल जैन यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर जेव्हा त्यांचे मंगळसूत्र, सिंदूर आणि चुडा घातलेले फोटो बाहेर आले तेव्हा लोकांना ते फोटो खूपच आवडले. सोशल मीडियावरही त्यांचे फोटो खूप वायरल झाले होते. नुसरत यांना त्यावेळी काही हिंदूंच्या धार्मिक विधी करताना पाहिले होते. यांमुळेच त्यांच्या विरोधात फतवे निघाले होते.
नुसरत यांनी २०१० साली कोलकाता फेयर वन ब्युटी कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर त्यांनी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. त्यांनी ‘शोत्रू’ चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. नुसरत सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या नेहमी त्यांचे फोटो, व्हिडिओ आणि काही अपडेट्स त्यांच्या फॉलोवर्सना देत असतात.