अभिनेत्रीपासून खासदार बनल्यानंतर, बंगाली चित्रपटांची सुप्रसिद्ध कलाकार नुसरत जहाँ तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही सतत चर्चेत असते. निखिल जैनपासून वेगळं होऊन मुलाला जन्म दिल्यानंतर, ती सध्या अभिनेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आतापर्यंत तिने या नात्यावर मौन पाळलं होतं. पण आता हळूहळू सोशल मीडियावर समोर येणारे फोटो, या दोघांमध्ये खास नातं असल्याचं सांगत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी आई झालेली नुसरत आता काश्मीरमध्ये बॉयफ्रेंड यश दासगुप्तासोबत एन्जॉय करत आहे. तिने एक फोटो शेअर करून याचा खुलासा केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर आता ट्रोलर्स तिची शाळा घेत आहेत. या फोटोवर एकाने कमेंट केली आहे की, “बाळा घरी सोडून गेलीस, किती निष्काळजी आई आहेस.” तर दुसरा युजर म्हणतोय, “थोडी लाज वाटू दे.” (nusrat jahan gets romantic with yash dasgupta in kashmir trolls says what about your 2 months baby)
आई झाल्यापासून नुसरत जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती एकटीच बर्फाचा आनंद लुटताना दिसत आहे. मात्र जरी ती एकटी दिसत असली, तरीही यश दासगुप्ताचा या फोटोशी संबंध आहे. या फोटोमध्ये तिने हातात छत्रीही घेतली आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिलंय की, ‘जर किसेस बर्फ असत्या, तर मी तुला बर्फाचं वादळ पाठवलं असतं. यासोबत नुसरतने काश्मीर व्हॅली, स्नोफॉल, हॉट चॉकलेट वेदर आणि विंटर रोमान्स हे हॅशटॅग दिले आहेत.
हा फोटो पाहून ती रोमँटिक मूडमध्ये असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत. नुसरतने फोटोचे श्रेय यश दासगुप्ताला दिले असून, त्यंच्या नावापुढे तिने ‘beloved’ म्हणजेच प्रिय असं लिहिलं आहे.
नुसरतने अद्याप अधिकृतपणे यश दासगुप्तासोबतच्या लग्नाची घोषणा केलेली नाही. मात्र सोशल मीडियावरील फोटोच्या माध्यमातून वेळोवेळी ही गोष्ट सिद्ध होत आहेत. नुसरतने यशला तिच्या मुलाचे वडीलही म्हटले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये दिल्लीला पोहचले वानखेडे; ‘कामानिमित्त आलो आहे’, म्हणत दिले स्पष्टीकरण