Thursday, November 21, 2024
Home टेलिव्हिजन OMG! नायरा बॅनर्जीने सह-कलाकार गौतम गुलाटीबद्दल केले धक्कादायक विधान, म्हणाली…

OMG! नायरा बॅनर्जीने सह-कलाकार गौतम गुलाटीबद्दल केले धक्कादायक विधान, म्हणाली…

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री नायरा बॅनर्जी (Nyra Banerjee) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.  तिच्या दमदार अभिनयाची आणि सौंदर्याची अनेकदा चर्चा पाहायला मिळते.  त्याचबरोबर ती वेगवेगळ्या कारणानेही अनेकदा चर्चेत असते. अलिकडेच तिने सह कलाकार गौतम गुलाटीबद्दल (Gautam Gulati) एक धक्कादायक विधान केले आहे. ज्याची सध्या चर्चा सुरू आहे, काय आहे हे सगळे प्रकरण चला जाणून घेऊ. 

प्रसिद्ध अभिनेत्री नायरा बॅनर्जीला ‘दिव्यदृष्टी’ मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक झाले होते. नुकतीच ती ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम विथ रुही सिंग’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिला अनेक आव्हानात्मक खेळ खेळावे लागले होते. ज्यामध्ये तिला अनेक कठीण प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली होती. या कार्यक्रमात सहभागी कलाकारांना एकमेकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात किंवा त्यांना सांगेल ते खावे किंवा प्यावे लागते. या कार्यक्रमात नायराने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या कार्यक्रमात तिला सगळ्यात वाईट सहकलाकाराचे नाव विचारण्यात आले होते.  त्यावेळी तिने अभिनेता गौतम गुलाटीचे नाव घेतले होते, ज्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

तत्पुर्वी, नायरा आणि गौतम गुलाटीने अल्ट बालाजीची वेबसिरीज ‘ऑपरेशन कोबरा’ मध्ये एकत्र काम केले होते. ही वेबसिरीज २०१९ मध्ये प्रदर्शित झाली होती. परंतु याचवेळी त्यांचे जोरदार मतभेद झाले होते. त्यामुळेच तिने या कार्यक्रमात तिचे नाव घेतले असावे. या कार्यक्रमात तिने नायराने जोरदार डान्सही केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, नायराने २००७ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरूवात केली होती. मात्र या क्षेत्रात तिला प्रचंड संघर्ष केल्यानंतर काम मिळाले होते.  तिला ‘दिव्यदृष्टी’ या मालिकेतून विशेष प्रसिद्धि मिळाली होती.

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा