Saturday, June 29, 2024

जवानांसोबत आर्मी दिन साजरा करत ‘खिलाडी कुमार’ खेळला व्हॉलीबॉल, पहा त्याचा हा खास व्हिडिओ

संपूर्ण देशात दरवर्षी १५ जानेवारी हा दिवस सेना दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी १९४९ साली फील्ड मार्शल जनरल करियप्पा यांनी स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली होती. भारत आज ७३ वा सैन्य दिन साजरा करत आहे. याच दिनाच्या औचित्याने खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारने सुद्धा हा दिन साजरा करत भारतीय जवानांसोबत वेळ घालवत त्यांच्यासोबत व्हॉलीबॉल खेळ खेळला.

अक्षय कुमार आणि क्रिती सॅनॉन सध्या त्यांच्या आगामी ‘बच्चनपांडे’ या सिनेमाचे राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मागील काही दिवसांपासून चित्रीकरण करत आहे.

 

आज सैन्य दिनाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि क्रिती सॅनॉन यांनी पश्चिम राजस्थानच्या भारत-पाकिस्तान या आंतरराष्ट्रीय सीमेवरील जवानांची भेट घेतली. या खास दिनाच्या निमित्ताने जैसलमेरमधील आर्मी स्टेशनच्या सगत सिंग स्टेडियममध्ये आयोजित ‘विजय रण फॉर सोल्जर मॅरेथॉन’ला त्याने हिरवा कंदील दाखवला. यावेळी अक्षयने तेथील जवानांसोबत व्हॉलीबॉल देखील खेळला.

याचाच एक व्हिडिओ अक्षयने सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने लिहिले, “सैन्य दिनाच्या निमित्ताने आज मॅरेथॉन सुरू करण्यासाठी मला आपल्या देशातील काही शूर योद्ध्यांना भेटण्याची संधी मिळाली. वॉर्म अप करण्यासाठी व्हॉलीबॉल खेळण्यापेक्षा काय चांगले आहे.” यावेळी सैन्यदलातील अनेक जवान आणि मोठे अधिकारी देखील उपस्थित होते.

अक्षय कुमार नेहमीच जवानांसाठी अनेक चांगली कामं करत असतो. त्याच्या बोलण्यातून नेहमीच जवानांबद्दल त्याला असलेल्या आदराचे दर्शन लोकांना दिसत असते. अक्षयने त्याच्या करियरमध्ये अनेक वेळा आर्मी जवानाची भूमिका साकारली आहे.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर अक्षयचा ‘लक्ष्मी’ हा २०२० मध्ये OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा होता. हा चित्रपट लव्ह जिहादमुळे वादात अडकला होता. यावर्षी अक्षयचे सूर्यवंशी, अतरंगी रे, बेल बॉटम, पृथ्वीराज आणि बच्चन पांडे हर सिनेमे प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा