Saturday, April 20, 2024

हाऊज द जोश! सिनेमात आर्मी ऑफिसरचा रोल साकारुन देशभक्तीची लाट निर्माण करणारे अभिनेते

बॉलिवूडने नेहमीच भारतीय सेनेचा सन्मान केला आहे. बॉलीवूडमध्ये असे अनेक हिंदी चित्रपट बनले आहेत ज्यात आपल्या सेनेचे पराक्रम दाखवले आहे. यामध्ये काही भारत – पाकिस्तानची फाळणी यावर आधारित आहेत तर काही चित्रपटात भारत – चीनचे युद्ध दाखवले आहे. भारत देशाने 26 जानेवारी 2021 रोजी आपला 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला.

याच दिनाचे औचित्य साधून टीम दैनिक बोंबाबोंब तुम्हाला काही अशा अभिनेत्यांबद्दल सांगणार आहे, ज्यांनी अनेक चित्रपटात आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्सच्या ऑफिसरचे पात्र रंगवून सगळ्यांची मन जिंकली. गमतीचा भाग म्हणजे असे सिनेमे पाहून विरोधी राष्ट्रांनी ते चित्रपट आपल्या देशांत प्रदर्शितच होऊ दिले नाहीत.

विकी कौशल
विकी कौशलचा ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक ‘ चित्रपट जानेवारी 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ‘विकी कौशल’ने भारतीय सेनेतील ‘विहान सिंह शेरगील’ची भूमिका निभावली होती. या चित्रपटातील विकाचा ‘हाऊज द जोश’ हा डायलॉग खूप हिट झाला होता. त्याच्या या उत्कृष्ट अभिनयाबद्दल त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत केले होते.

अक्षय कुमार
‘हॉलिडे : अ शोल्जर इस नेवर ऑफ डयुटी’ या चित्रपटात अक्षयने फौजीची भूमिका साकारली होती. या व्यतिरिक्त तो अब तुम्हारे हवाले वतन साथीयों या चित्रपटात सैनिकाच्या भूमिकेत दिसला होता.

अजय देवगण
मल्टी स्टार चित्रपट एलओसीमध्ये अजय देवगण आर्मीमधला एक धैर्यवान शिपाई बनला होता. या चित्रपटाला अँटी पाकिस्तान करार देऊन शेजारील राष्ट्रांनी बॅन केलं होत. या चित्रपटाचे दिग्दर्शक ‘जेपी दत्ता’ हे होते. या चित्रपटात कारगिल युद्ध आणि त्याच्याशी संबंधित परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला होता.

अमिताभ बच्चन
बिग बी अमिताभ बच्चन यांनी सुद्धा अनेक चित्रपटात आर्मी ऑफिसरचे पात्र निभावलं आहे. मेजर साब ,अब तुम्हारे हवाले वतन साथीयों आणि लक्ष यांसारख्या चित्रपटात बिग बी यांनी वर्दी घालून चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

सनी देओल
बॉर्डर हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला. भारत पाकिस्तानच्या युद्धावर हा चित्रपट बनवला होता. जे. पी. दत्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यातील फक्त गाणीच नाही तर पात्र आणि डायलॉग सुद्धा सुपरहिट झाले. या चित्रपटात सनी देओलने मेजर कुलदीप सिंग चंदपुर यांचं पात्र निभावलं होतं.

हे देखील वाचा