Friday, December 5, 2025
Home बॉलीवूड चित्रपटसृष्टीपासून लांब असलेल्या शमिता शेट्टीची कमाई आहे कोटींच्या घरात; आकडा वाचून बसेल धक्का

चित्रपटसृष्टीपासून लांब असलेल्या शमिता शेट्टीची कमाई आहे कोटींच्या घरात; आकडा वाचून बसेल धक्का

‘बिग बॉस’ १५चे नवे पर्व सुरू झाले आहे. ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी शिल्पा शेट्टीची बहीण अभिनेत्री शमिता शेट्टीला ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या शोमध्ये स्पर्धक म्हणून निवडले आहे. या भागात पुनरागमन केल्यापासून शमिता चर्चेत आली आहे. या परिस्थितीत शमिता बऱ्याच अडचणीचा सामना करत आहे.

‘बिग बॉस’ शोमध्ये शमिताला पाहून अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे‌. जेव्हापासून राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवतो, हे प्रकरण समोर आले, तेव्हापासून प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न सतत उपस्थित होत आहे की, चित्रपटांपासून दूर राहूनही शिल्पा शेट्टीची बहीण शामिलाचा कमाईचा स्रोत काय आहे? अभिनेत्री  शिल्पा शेट्टी एक बिझनेस वुमन देखील आहे. तिची कमाई प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. तिची बहीण शमिता शेट्टी सध्या काय करते, किती पैसे कमावते, हे तुम्हाला माहित आहे का?

शमिता शेट्टी बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांमध्ये दिसली नाही. ती गेल्या वर्षी ‘ब्लॅक विडो’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. त्याआधी ती बऱ्याच काळापासून चित्रपट जगतापासून दूर होती. शमिता एक अभिनेत्री तसेच इंटिरियर डिझायनर आहे. यासह, ती अनेक ब्रँड एंडोर्समेंटशी संबंधित आहे.

शमिता सध्या कोट्यवधीं रुपये कमावत आहे, जरी ती चित्रपटसृष्टीपासून दूर असली, तरीही अनेक ब्रँड एंडोर्समेंटशी संबंधित कामांमधून लाखो रुपये कमावतो. शमिताची एकूण संपत्ती १ ते ५ मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास ३७ कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. शमिताने बिग बॉसच्या घरात परत येण्यासाठी भरमसाठ फी घेतली आहे.

बिग बॉसच्या प्रत्येक पर्वाला वादग्रस्त शो म्हटले जाते. ‘बिग बॉस’चे पुढील भाग पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. या भागात शमिताच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. शमिता शेट्टीला बिग बॉसच्या घरात पाहिल्यानंतर अनेक लोक सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

हे देखील वाचा