Friday, July 5, 2024

ऑलिंपिक पदक विजेती मिराबाई चानू ‘डान्स दीवाने ३’च्या मंचावर झाली भावुक; व्हिडिओ जोरदार व्हायरल

टेलिव्हिजनवरील अनेक रियॅलिटी शो आहेत, पण त्यातील कलर्स टीव्हीवरील ‘डान्स दीवाने ३’ हा शो सध्या जोरदार चर्चेत आहे. या शोचे परिक्षण माधुरी दीक्षित करत आहे. या शोबाबत सध्या अनेक चर्चा चालू असतात. या शोचे सूत्रसंचालन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया करत आहेत. त्यामुळे डान्स सोबतच या शोमध्ये मनोरंजनाचा जोरदार तडका पाहायला मिळत असतो. या शोच्या आगामी एपिसोडमध्ये ऑलिंपिक रौप्य पदक विजेती आणि भारताची स्टार वेटलिफ्टर मिराबाई चानू दिसणार आहे. या एपिसोडचा प्रोमो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, मिराबाई चानू डान्स दीवानेच्या मंचावर खूपच भावुक झालेली दिसत आहे. ती म्हणते की, “यांचा डान्स पाहून मला सगळे काही आठवले. तुम्ही सगळेजण मला माफ करा.” आता प्रेक्षक हा एपिसोड पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

मिराबाई चानू ही घरी आल्यावर अनेक कलाकरांना भेटली आहे. तिने नुकतेच काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली होती. (olympic silver medalist silver medalist mirabai chanu gets emotional on the sets of dance deewane 3)

सलमान खानसोबत भेट झाल्यानंतर सलमान खानने मिराबाई सोबत इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले होते. यावर तिने कमेंट केली होती की, “खूप खूप धन्यवाद सलमान सर. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. तुम्हाला भेटणे हे माझ्यासाठी एक स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे.”

मिराबाई सध्या मुंबईमध्ये असून तिने याआधी एका मुलाखतीत देखील सांगितले होते की, ती सलमान खानची खूप मोठी फॅन आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुपरस्टार खेसारी लाल यादवने वातावरण बनवले भक्तीमय; ‘महाकाल की दिवानी’ गाणं यूट्यूबवर घालतंय धुमाकूळ

-जिगरी यारी! अंकुश चौधरी अन् संतोष जुवेकर निघाले भटकंतीला, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

-‘हा’ दिग्गज अभिनेता नसता, तर बॉलिवूडला मिळाला नसता ‘कॉमेडीचा बादशाह’ जॉनी लिव्हर; वाचा त्यांचा रंजक प्रवास

हे देखील वाचा