सध्याच्या काळात सर्वात चर्चित असणाऱ्या मालिकांपैकीच एक आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’. ही मालिका पाहायला प्रेक्षक दररोज आवर्जून टीव्हीसमोर बसतात. यातील कलाकारांचा अभिनय आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ‘ओम’ अन् ‘स्वीटू’ची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूप आवडते. त्यातील स्वीटू अर्थातच अभिनेत्री अन्विता फलटणकर या मालिकेद्वारे दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. तिचे फोटो व व्हिडिओ चाहत्यांकडून खूप पसंतही केले जातात.
नुकताच अन्विताने एक अतिशय रोमँटिक फोटो शेअर केला आहे. हा एक ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो आहे, जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, ओमच्या शेजारी स्वीटू बसलेली आहे. इतकेच नव्हे, तर स्वीटूने तिचं डोकंही ओमच्या खांद्यावर ठेवलं आहे. त्यांचा हा रोमँटिक अंदाज चाहत्यांकडून खूप पसंत केला जात आहे.
ओम आणि स्वीटू प्रेमात बुडालेला हा फोटो सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो शेअर करत अन्विताने कॅप्शनमध्ये ‘सॉंवली सी रात!’ असं लिहिलं आहे. चाहते कमेंट सेक्शनमध्ये दोघांवर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. फोटो पोस्ट होता क्षणीच व्हायरल होऊ लागला होता. यामुळेच आतापर्यंत या फोटोवर १५ हजारहून अधिक लाईक्स आले आहेत. (om and sweetus romantic photo goes viral on internet)
अन्विताच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने नाटकांपासून ते बऱ्याच चित्रपटामध्ये अभिनय करून, रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तिने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर ‘गर्ल्स’ या चित्रपटात ती ‘रुमी’च्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. याशिवाय अन्विताने ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू










