ओम राऊतचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि अपयशी देखील ठरला. मागील बऱ्याच दिवसांपासून या सिनेमाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. रामायणावर आधारित असलेल्या या सिनेमाकडून प्रेक्षकांना आणि समीक्षकांना खूपच अपेक्षा होत्या. मात्र सर्वांच्या अपेक्षा फोल ठरल्या. आदिपुरुष सिनेमाला अनेक गोष्टींसाठी ट्रोल केले गेले. हा सिनेमा जाहीर झाल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या वादात अडकला. आधी सिनेमाचा ट्रेलर लीक झाला. त्यानंतर सिनेमाला संवाद, व्हिएफएक्स कलाकारांचे पोशाख, सैफ अली खानची निवड आदी अनेक कारणांवरून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले. असे असूनही आजही बरीच ठिकाणी सिनेमा चालू आहे. मात्र या सिनेमासमोर येणारी आव्हाने थांबण्याचे काही नाव घेत नाही.
नुकताच आदिपुरुष हा सिनेमा यूट्यूबवर लीक झाला आहे. सिनेमाची ऑनलाइन पायरेसी झाल्यानंतर आता हा सिनेमा लीक झाला आहे. एका मोठ्या न्यूज पोर्टलच्या माहितीनुसार आदिपुरुष यूटुबवर एचडी स्वरूपात लीक झाला होता. काही तासातच सिनेमाला २.३ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिले. मात्र आता हा सिनेमा यूटुबवर उपलब्ध नाही. तो डिलीट केला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे लेखक असलेल्या मनोज मुंतशीर यांनी सर्वच लोकांची बिनशर्त सिनेमात असणाऱ्या वादग्रस्त संवादांसाठी माफी मागितली होती. “भगवान हनुमानाचे आशीर्वाद सदैव आपल्याबरोबर आहेत. देव आपल्याला पवित्र सनातन आणि आपल्या महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो” अशा आशयाचे ट्विट मनोज मुंतशीर यांनी केले होते. तत्पूर्वी १६ जूनला प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान आणि देवदत्त नागे मुख्य भूमिकेत आहेत.
अधिक वाचा-
–शोएब इब्राहिम पत्नी अन् चिमुरड्याला घेऊन रुग्णालयातून आला बाहेर, फोटो व्हायरल
–‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल